बापाला दिली मुलीने मुख अग्नी

0
16

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

भुसावळ येथील जुना जळगाव रोडवर असलेल्या भिरुड कॉलनीत दि.२१ रविवार रोजी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान पंढरी ओंकार बोखारे-पाटील यांचे वृद्धपकाळात वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले.पंढरी बोखारे-पाटील यांना एकच मुलगी निलीमा सुनील पाटील हिने बापाची सेवा केली मुलाचा उणीव भासू दिली नाही.

धर्म शास्त्र नुसार आई वडील यांच्या निधनानंतर मुलगा मुख अग्नी देतो.असे असले तरी २१ व्या शतकातील परिवर्णवादी विचारांच्या निलीमाताई ने वडिलांच्या निधनानंतर अग्नी देण्याचा निर्णय घेतला निलीमाताईच्या निर्णयाचे समाज बांधवांनी कौतुक केले.निलीमाताई व त्यांचे पती सुनिल माणिक पाटील हे दोघे पती,पत्नी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.सुनिल पाटील छत्रपती क्रांती सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष आहे.पाटील कुतुबात शाहू,फुले,आंबेडकर विचारांचा पगडा असून हे कुटूंब समाज सेवा हेच आपले कर्तव्य समजत असतात निलीमाताईंच्या धाडसाचे महिलान मध्ये सर्वत्र कौतुक होताना दिसले.महिला ही सर्वच क्षेत्रात सक्षम असल्याचा हा पुरावा आहे.ते योगेश बोखारे-पाटील,संजय बोखारे-पाटील यांचे काका होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here