साईमत लाईव्ह वाळूज महानगर प्रतिनिधी, औरंगाबाद
श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त वाळूज औद्योगिक नगरीत बजाज नगरात श्रीकृष्ण मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्हासात पार पडला प्रवचन,श्री कृष्ण जन्मा वरील प्रसंग,आदी कार्यक्रम श्रीकृष्ण मंदिर बजाज नगर ट्रस्टच्या वतीने आयोजित केल्याने श्रीकृष्ण जन्मोत्सवनिमित्त श्रीकृष्ण मंदिरात चैतन्यमय आणि भक्ती रसाचे वातावरण निर्माण झाले होते ११:४५ वाजता श्रीकृष्ण जन्म महापूजेस शुभारंभ झाला. सुरुवातीला भगवान श्री कृष्णाच्या मूर्तीस पंच द्रव्यांनी महाभिषेक संपन्न झाला यावेळी महानुभाव पंथाचे विनोद बाबा शास्त्री आंबेकर यांच्या हस्ते भगवान श्रीकृष्णाला 101 पदार्थाचा नैवद्य भरवून महिलांनी श्रीकृष्णाच्या बाल रूपाचे पूजन करत श्रीकृष्णाचा पाळणा हलवत श्रीकृष्ण जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्हासात आणि आनंदात साजरा करण्यात आला यावेळी श्रीकृष्ण मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, चिमणराव जाधव.
उपाध्यक्ष ज्ञानदेव चव्हाण, सेक्रेटरी दिगंबर भालेराव, कोषाध्यक्ष काकासाहेब सोळुंके, विश्वस्त भाऊसाहेब मोडके,रंगनाथ वालझाडे,केशव जाधव,चक्रधर पठाडे,बाबासाहेब पठाडे, गोरख भालेकर, रावसाहेब गावंडे, अंकुश मातकर, आबासाहेब फसले,बाळासाहेब साबळे, नितीन बोराळकर आदींसह परिसरातील भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती