आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढणार – आशुतोष काळे

0
34

साईमत लाईव्ह अहमदनगर प्रतिनिधी 

कोपरगाव शहरामध्ये दोन दिवसांपूर्वी चौकात दहिहंडी स्वागत कमान उभारणीवरून वाद निर्माण झाला होता. या वादात भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत मोठा राडा झाला होता. यामध्येच आता शिर्डीतील साईबाबा संस्थानाचे अध्यक्ष तसेच कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी भाजपचे नेते व कार्यकर्त्यांना इशारा दिला आहे.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या कार्यक्रमाच्या शेवटी आमदार आशुतोष काळे यांनी विरोधकांना टोलादेखील लगावला आहे. ते म्हणाले की, आमच्या नादाला लागाल तर ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही. काही लोकांना वाटतेय सरकार बदलले आहे. त्यामुळे त्यांचा उत्साह वाढलेला आहे; परंतु आमदार बदललेला नाही आमदार मीच आहे, असा टोला त्यांनी भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांना यावेळी लगावला आहे. तसेच काल दोन्ही पक्षाचे दहीहंडी कार्यक्रम देखील त्याच जागेवर शेजारी शेजारी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here