Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»मुक्ताईनगर»मुसळधार पावसातही जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
    मुक्ताईनगर

    मुसळधार पावसातही जनसंवाद यात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    SaimatBy SaimatAugust 19, 2022Updated:August 19, 2022No Comments4 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह मुक्ताईनगर प्रतिनिधी 

    15 ऑगष्ट स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाचं औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्या तथा जळगांव जिल्हा बँकेच्या संचालिका डॉ. रोहिणीताई खडसे – खेवलकर यांनी जनसंवाद यात्रा सुरू केली. र16 ऑगस्ट रोजी या जनसंवाद यात्रेचा दुसरा दिवस होता. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील 182 गावांमध्ये ही यात्रा पोहचणार आहे. स्वातंत्र्यदिनी बोदवड तालुक्यातील राऊतझिरा येथून जनसंवाद यात्रेचा शुभारंभ झाला. मुसळधार पावसातही कार्यकर्ते आणि गावकऱ्यांचा उत्साह तसूभरही कमी झालेला दिसला नाही.
    ह्या जनसंवाद यात्रेचे जो तो ज्याच्या त्याच्या परीने विश्लेषण करेल; परंतु कुठल्याही प्रकारच्या निवडणुका समोर किंवा जवळ नसतांना लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याच्या निराकरणासाठी निघालेली ही एकमेव यात्रा असावी. त्यामुळे स्वार्थासाठी ही यात्रा आहे अशी कोल्हेकुई करण्याचा जे प्रयत्न करतील त्यांची बोलतीच बंदच झाली आहे. ज्यांचा पिंडचं जनसेवेचा आहे त्यांना लोकांशी संवाद साधण्यासाठी निवडणुकीची गरज नसते. जनसेवा हा त्यांचा ठायी स्वभाव असतो. हे रोहिणीतार्इंच्या ह्या जनसंवाद यात्रेतून अधोरेखित झाले आहे.
    16 ऑगस्ट रोजी जुनोना, सोनाटी, अमदगावं, हिंगणे असा सुरू झालेला प्रवास त्यात स्थानिक नागरिकांचा उत्साह बघता रोहिणीतार्इंची जनसंवाद यात्रा हे आपल्या हक्काचे व्यासपीठ असल्याचे जाणवले. लोकांनी घरकुल, मनरेगा विहिरींचे न मिळलेल अनुदान, विधवा महिला, वृद्धांचे पगार, व्यायामशाळा, क्रीडांगण, सभागृह अशा समस्या मांडल्या नुसत्या मांडल्याच नाही तर त्याबाबत आग्रही मागणी केली. नाथाभाऊंनी आमच्या गावासाठी रस्ते दिले , सभागृह दिले , ज्या सुविधा दिसतायत त्या भाऊंनी दिल्या आहेत असे नागरिक ठिकठिकाणी प्रतिक्रिया देतांना सांगत होते. आमचा तालुका दुर्लक्षित होता पण 1990 साली नाथाभाऊ आमदार झाले तेव्हापासून डांबरी रस्त्यांचे इथे जाळे विणले गेल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
    रोहिणीतार्इंनी सुद्धा लोकांच्या ह्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. एका पराभवाने मी खचून जाणार नाही. निवडणुका येतील आणि जातील परंतु मी घेतलेला जनसेवेचा वसा कधी सोडणार नाही.असे सांगत भाऊंच्या माध्यमातून आता आपल्या समस्या सोडविल्या जातील त्यासाठी पक्ष पदाधिकारी आणि मी स्वतः सतत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तुमच्या चेहऱ्यावर आज दिसत असलेले समाधान हीच, आमची पुण्याई आहे ,जेव्हा केव्हा हाक द्याल तेव्हा मी आपल्या सेवेसाठी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह हजर राहीन असे आश्वस्त केले.
    प्रत्येक गावात सेल्फी काढण्यासाठी असलेला तरुणाईचा आग्रह त्यांनी स्वीकारत प्रत्येक कार्यकर्त्यासोबत सेल्फी काढली. ह्यावरून तरुणाईत असलेली त्यांची क्रेझ पुन्हा दिसून आली. यात्रेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संदिप भैय्या पाटील,जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे,बोदवड राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष आबा पाटील,मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष यु डी पाटील सर, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रदिप बडगुजर,बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, बाजार समिती संचालक रामदास पाटील,नगरसेवक भरत अप्पा पाटील,जाफर शेख, दिपक झंबड, हकीम बागवान,माजी सभापती किशोर गायकवाड,विलास धायडे, युवक तालुका अध्यक्ष विनोद कोळी, गोपाळ गंगतिरे, सम्राट पाटील, निलेश पाटील, शिवाजी ढोले, विलास देवकर, वामन ताठे, ज्ञानेश्वर पाटील, डॉ ए एन काजळे, विजय चौधरी, निना पाटील, जितेंद्र पाटील, प्रमोद धामोळे, कालू मेंबर, रवी खेवलकर, श्‍याम पाटील, फिला राजपूत, आनंदा पाटील, नईम बागवान, कृष्णा पाटील, प्रदिप साळुंखे, बाळाभाऊ भालशंकर, बबलू सापधरे, नंदकिशोर हिरोळे, चेतन राजपूत, भैय्या पाटील, विकास पाटील, कविता गायकवाड, अश्विनी पाटील या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
    जुनोने येथे बहादुरपाटील, कैलास पाटील, पंडित पाटील, गणपत पाटील, हिरामण ठेलारी, देविदास पाटील, विठोबा
    पाटील, पुंडलिक पाटील, सुभाष पाटील, अर्जुन पाटील, प्रल्हाद पाटील, मधुकर पाटील, वसंत गुरचळ, सुरेश गुरचळ, सुरेश सुरवाडे, प्रकाश सुरवाडे, साहेबराव पाटील, अजबराव पाटील, सिताराम पाटील, सुभाष बोदडे, सुनील बोदडे, प्रवीण बोदडे, शुभम गुरचळ, मुरलीधर शेजोळे, मुकुंदा गुरचळ, संजू परीहार, हरिभाऊ उमराव, दिलीप डोंगर, राजेंद्र पाटील, गजानन कौतिक, मंगल पाटील, शेषराव पाटील, विजय निनु, कृष्णा पाटील, सुनील हरसिंग, अरुण पाटील, भगवान जालम, अवचित पाटील, मुकुंदा पाटील, निंबाजी पाटील, सोनोटी येथे सरपंच सीमा तोरे, दीपक तोरे, सुनील बोदडे, बंडू पाटील, पप्पू पाटील, तानाजी तोरे, समाधान तोरे, अजय तोरे, पंडित तोरे, स्वप्नील बोदडे, तुषार बोदडे, श्रीकृष्ण बोदडे, विनोद बोदडे, भगवान बोदडे, पोलीस पाटीलअनिल इंगळे, भगवान इंगळे, नंदलाल पट्टे, शिवाजी पाटील, उखर्डू पाटील, रामेश्वर पाटील. आमदगाव येथे सरपंच संभाजी पारधी, उपसरपंच मिलिंद गुरचळ, चंद्रकांत पाटील, गजानन कोलते, अमोल कोलते, निर्मलाबाई खोंडे, विशाल पाचपांडे, मनोज बोदडे, हेमराज पाटील, ज्ञानदेव आत्तरदे, वासुदेव किनगे, अमर पारधी, दत्तात्रय पाटील, प्रदीप किनगे, कडू पाटील, श्रीकृष्ण कोलते, भागवत पाटील, विनोद पाटील, हिंगणे येथे रामराव पाटील, सरपंच मनीषा पाटील, उपसरपंच जनार्दन होडगरे, रवींद्र पाटील,राजेंद्र पाटील, आनंदा पाटील, पंडित पाटील, पांडुरंग न्याहाजी पाटील, पंडित होडगरे, सोपान होडगरे, जनार्दन होडगरे, निवृत्ती पाटील, रमेश पाटील, कृष्णा पाटील, संजय पाटील, नामदेव पाटील, भरत पाटील, सोपान होडगरे आदींसह शेकडो कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Big Breaking! राज्य निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; जि.प.–पं.स. निवडणुकीची रणधुमाळी सुरू

    January 13, 2026

    Muktainagar : प्रेम पुरकरच्या ऐतिहासिक यशाने मुक्ताईनगरचा अभिमान उंचावला

    January 13, 2026

    Girish Mahajan on Raj thackeray : राज ठाकरे यांच्यावर सडकून टीका – “निवडणूक आली की मराठी अस्मिता आठवते!”

    January 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.