युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे आज काव्यरत्नावली चौकात तरूणींची दहीहंडी

0
17

साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी 
युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे आज 19 ऑगस्ट रोजी काव्यरत्नावली चौक येथे सायंकाळी 6 वाजेपासून तरूणींची दहीहंडी आयोजित करण्यात आली आहे. सदर आयोजनाचे हे 14 वे वर्ष असून यावर्षी मोठ्या प्रमाणात आयोजनाची तयारी करण्यात आली आहे.
डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचे मुलींचे गोविंदा पथक, शिवतांडव प्रतिष्ठानचे 130 वादकांचे ढोल पथक, हायटेक लाईटस, बालगोपालांसाठी श्रीकृष्ण वेषभूषा स्पर्धा, मल्लखांबचे थरारक प्रात्यक्षिक, सांस्कृतिक नृत्य आदी. या दहीहंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे.
जळगाव जिल्ह्यात सार्वजनिक रित्या युवाशक्ती फाऊंडेशनतर्फे एकमेव तरूणींच्या गोविंदा पथकाची दहीहंडी आयोजित करण्यात येते. दहीहंडी सारख्या उत्सवात महिलांना मुख्य प्रवाहात आणून उत्सवाचा आनंद द्विगुणीत करणे हे या आयोजनामागील युवाशक्ती फाऊंडेशचा उद्देश आहे.कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जैन इरिगेशन सिस्टम्स लि.चे अध्यक्ष अशोकभाऊ जैन, सिद्धीविनयक गणपती मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष संजय सावंत, महापौर जयश्रीताई महाजन, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, संदीप गवळी, उपमहापौर कुलभूषण पाटील, मनपा आयुक्त विद्या गायकवाड,डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.गौरी राणे, मुळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.स.ना.भारंबे, रामानंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय शिंदे, अनुभूती शाळेच्या संचालिका निशा जैन, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके, सार्वजनिक गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, सिद्धार्थ बाफना, अजय ललवाणी, प्रेम कोगटा, रजनीकांत कोठारी, पारस राका, प्रविण पगारीया, जळगाव जनता बँकेचे संचालक ललित चौधरी, सपन झुनझुनवाला,वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे, डॉ. विकास बोरोले,डॉ.शितल ओसवाल, प्रितम रायसोनी,डॉ. प्रिती अग्रवाल, विद्या इंग्लीश मिडीयम शाळेच्या मुख्याध्यापिका कामिनी भट, विराफ पेसुना, अखिल तिलकपुरे, प्रतिक पलोड यासह शहरातील 10 उद्यमशील महिला उपस्थित राहणार आहेत. युवाशक्ती फाऊंडेशनचे 150 स्वयंसेवक विशेष गणवेशात कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेणार आहेत.
कोरोना काळानंतर प्रथमच शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात उत्सवाचे आयोजन होत आहे तरी जास्तीतजास्त जळगावकर नागरिकांनी या आयोजनात सहभागी व्हावे असे आवाहन युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक विराज कावडीया व सचिव अमित जगताप यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here