एमआयडीसी हद्दीतील दोन हॉटेलवर पोलिसांचा छापा

0
15
साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी 
भुसावळ आणि औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन हॉटेलवर गुरुवारी सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांनी हॉटेलमधून डझनभर कपल्सला पकडले असून चौकशी कामी त्यांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. दरम्यान , या कारवाईने शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
शहरात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले असून पोलीस अवैध धंद्यांना लगाम घालण्यात अयशस्वी ठरत आहे. जळगावात अनेक ठिकाणी अवैध कुंटनखाने, सट्टा, जुगार अड्डे सुरू असून पोलिसांना देखील त्याची माहिती आहे. सर्व खुलेआम सुरू असताना देखील पोलीस चिडीचूप असल्याने संशय व्यक्त होतो. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे आणि सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाकडून कारवाई केली जाते. जिल्ह्यात कुठे विशेष पोलीस महानिरीक्षकांचे पथक येऊन कारवाई करते, असे असताना देखील स्थानिक पोलीस शांत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये सुरू असलेला कुंटनखाना, अयोध्या नगर परिसरात सुरू असलेला कुंटनखाना पोलिसांनी उध्वस्त केल्यानंतर आज पुन्हा दोन हॉटेलवर पथकाने छापा टाकला आहे. औरंगाबाद महामार्गावर आर.एल.चौफुली ते जळगाव काटा दरम्यान असलेल्या एका हॉटेलवर आणि भुसावळ महामार्गावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयजवळ एका हॉटेलवर पथकाने छापा टाकला. दोन्ही ठिकाणाहून पथकाने १८ पेक्षा जास्त तरुण-तरुणींना ताब्यात घेतले आहे. सर्वांना एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
पथकाने धरपकड केल्याने प्रेमीयुगलांचे चेहरे रडके झाले असून पुढे काय होणार? अशी चिंता त्यांना लागून आहे. हॉटेल मालक देखील पोलीस ठाण्यात पोहचले असून आपली बाजू मांडत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here