अवैद्य वाळू साठ्यांचे पंचनामे करून दोषींसह संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठीचे आमरण उपोषण

0
16

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यात गौण खनीज व अवैद्य वाळू माफियांची दहशत वाढली असून अनेक ठिकाणी अवैद्य वाळू साठे पडून आहे. तर अवैद्य गौण खनिज उत्खनन करून सुरु असलेल्या चोरटी वाहतूक विरोधात भरारी पथक व महसूल विभागाकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने ईश्वर इंगळे यांनी दि १५ ऑगस्ट ७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषनास बसल्याने महसूल चा कारभार चव्हाट्यावर आला आहे. उपोषणा बाबत महसूल प्रशासन गांभीर्याने घेत नसल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले होते. अधिकारी व कर्मचार्यांना पाठीशी घालुन प्रकरण दडपण्याचा व महसूलच्या अधिकाऱ्यांवर आलेल्या राजकीय दबावामुळे उपोषण लांबू देत असल्याची चर्चा तहसील कार्यालयात रंगली होती. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी दि.१७ बुधवारी अकरा वाजेच्या सुमारास उपोषणार्थी ईश्वर इंगळे यांची तब्येत खालावल्याने खळबळ उडाली होती.

उपोषण स्थळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.धनंजय निरगुडे यांनी इंगळे यांची तपासणी केली. त्याच वेळी नायब तहसीलदार गोरखनाथ सुरे यांनी पंधरा दिवसांत पंचनामे व चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने यांच्याहस्ते शरबत पिऊन उपोषण सोडण्यात आले. या वेळी महसुलचे कर्मचारी साखळी उपोषणाचा पाठिंबा देणार पत्रकार बांधव उपस्थिती होते.

ईश्वर इंगळे यांची तब्येत खालावली होती . याचवेळी महसुलने पंधरा दिवसात चौकशी करून गुन्हा दखल करण्याचे लिखित आश्वासन दिल्याने उपोषण सोडण्यात आले. व तात्काळ इंगळे यांना पत्रकार बांधवानी उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय निरगुडे यांनी त्यांच्यावर उपचार करून त्यांना दुपारी डिस्चार्ज देण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here