साईमत लाईव्ह बोदवड प्रतिनिधी
येथील तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील चिखली – शेवगे बुद्रुक ग्रामसेवक यांचेवर कारवाईसाठी एक उपोषण तर नांदगाव येथील. घरकुल लाभार्थी यांचे निधी खात्यात आश्वासन देऊन सुद्धा वर्ग न झाल्याने दुसरे उपोषण सुरु आहे.
30/09/2022 रोजी ग्रा. पं. अधिकारी (ग्रा.प) यांच्या कडे आम्ही दिलेला तक्रारी अर्ज दि. 08/10/2021 रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडून तक्रारी अर्ज जिल्हा परिषद जळगाव यांच्याकडे पाठवण्यात आला. तसेच जिल्हापरिषदेकडून तो अर्ज दि. 20/10/2021 रोजी गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांच्याकडे पाठवून संबंधित अर्जाची चौकशी करून अहवाल सादर करण्यात यावा असे आदेश असतांना सुध्दा गट विकास अधिकारी यांनी अर्जामध्ये नमूद केलेल्या 1 ते 14 मुध्ये चौकशी करण्यात टाळटाळ करण्यात येत असून त्या अर्जावर गट विकास अधिकारी यांनी सरपंच व ग्रामसेवक यांना वेळोवेळी पत्र देवून अतिक्रमण बाबत. इतर मुद्द्याबाबत पत्रव्यवहार करून सुध्दा ग्रामपंचायतीने 1 ते 14 मुद्दयावर कोणतीही माहिती गट विकास अधिकारी यांना दिलेली नाही त्याबाबत गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवक सरपंच यांच्यावर नियमानुसार कार्यवाही करणे अपेक्षित असतांना सुध्दा कारवाई केल्याचे दिसून येत नाही गट विकास अधिकारी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही सहकार्य करण्याची भूमिका घेवून सुध्दा गट विकास अधिकारी यांनी आमची तक्रारदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. 13 ऑगष्ट पर्यंत सदर तक्रारी अर्जावर चौकशी होवून सदस्यांची आपत्राची कारवाई करावी. व ग्रामसेवक सरपंच व बॉडी यांना गट विकास अधिकारी पंचायत समिती बोदवड यांनी दि.05/05/2022 रोजी दिलेल्या पत्रानुसार सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करावी यासाठी दि. 15ऑगष्ट रोजी तहसील कार्यालय समोर
लालसिंग पंडित पाटील ,ईश्वर सखाराम न्हावी ,ज्ञानेश्वर रामकृष्ण पाटील रा. चिखली शेवगे ब्रु यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.तर नांदगाव येथील रमाई आवास योजनेचे निधी संबंधित लाभार्थ्यांचे पैसे त्यांचे खात्यावर वर्ग करण्यास आश्वासन देऊन सुद्धा कारवाई न झाल्याने प्रीतम अवचित पालवे यांनी 15 ऑगस्ट पासून उपोषण सुरु केले आहे.