सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे ७५ वा आजादीका अमृत महोत्सव विविध उपक्रम राबवून साजरा

0
33

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

सोयगाव तालुक्यातील बनोटी येथे ७५ आझादीचा अमृत महोत्सव दिमाखात पार पडला…
ग्रामपंचायत कार्यालय बनोटी मार्फत विविध कार्यक्रम ची आखणी करण्यात आली तसेच सर्व शिक्षक कर्मचारी अंगणवाडी सेविका व सर्व तरुण उत्सुक मित्र मंडळ यांच्या सहकार्याने तालुक्यातील सर्वात सूंदर कार्यक्रम घडून आला….!!
◆ हर घर तिरंगा
◆ भारतीय सैन्य मध्ये कार्यरत असलेल्या तरुणांच्या पालकांना सन्मानित करण्यात आले.
◆ अतिशय सुंदर व सुसज्ज असे कार्यालय सजावट करण्यात आली.
◆ वाद्य लावून ग्रामपंचायत समोर सामूहिक राष्ट्रगाणं व ध्वजारोहण झाले.
◆ जी. प. प्रशाळा बनोटी च्या विद्यार्थीनी नि अतिशय सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम घेतला.
◆तसेच गावातील मित्र मंडळ तरुणांनी मिठाई म्हणून गावात १ क्विंटल लाडू वाटप केली.
◆ शाळेसाठी डेस्क अजिंक्यतारा मित्र परिवारा मार्फत देण्यात आले.
◆ सर्व पदाधिकारी व कर्मचारी यांनी महाराष्ट्र ची संस्कृती म्हणजे फेटा बांधून पोशाख करून कार्यक्रम ची शोभा वाढवली…!!

असा देखणा कार्यक्रम सर्व ग्रामस्थ कर्मचारी पदाधिकारी सरपंच साहेब व ग्रामसेवक आदी सर्वांच्या अथक प्रयत्नांनी पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here