साईमत लाईव्ह दिल्ली वृत्तसंस्था
जर तुम्ही फेसबुकचा वापर करीत असाल तर समाजात कोणतेही तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. आपल्याकडून कोणत्याही प्रकारचे उल्लंघन होणार नाही, हे नेहमी ध्यानात ठेवा. अनेक जण फेसबुकवर चुकीच्या आणि आक्षेपार्ह पोस्ट शेअर करीत असतात. त्याचे परिणाम तुम्हाला महागात पडू शकतात. जर तुमच्या फ्रेंड लिस्टमधील लोकांना या पोस्टची माहिती मिळते. कारण, कंपनीने याला हटवले आहे. त्यामुळे कंपनी याला सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक मानते. तसेच आक्षेपार्ह पोस्ट हटवली नाही तर मोठी समस्या निर्माण होवू शकते. तसेच तुमच्या एका चुकीच्या पोस्टमुळे दंगा भडकावणे, समाजात तेढ निर्माण होणे, यासारख्या गुन्ह्याला तुम्ही कारणीभूत आहात, असे मानून तुम्हाला थेट जेलची हवा खावी लागू शकते.
आक्षेपार्ह भाषेत केलेल्या पोस्ट
जर तुम्ही अशा कोणत्याही पोस्ट लिहिल्या ज्यात तुम्ही आक्षेपार्ह लिखाण केले आहे किंवा अश्लील भाषेचा वापर केला आहे. अशा पोस्टवर आयटी नियमांनुसार कारवाई केली जावू शकते. ज्या व्यक्तीने ही पोस्ट केली आहे. त्याला जेलची हवा खावी लागू शकते.