साईमत लाईव्ह चोपडा प्रतिनिधी
महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल येथे इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आंतरदेशीय पत्रावर पत्रलेखनाचा उपक्रम राबविण्यात आला.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त चीफ पोस्ट मास्टर जनरल, इंडिया यांनी देशभरात हा उपक्रम राबविला आहे. महाराष्ट्रामध्ये सी. पी. एम. जी. मुंबई यांच्या अधिपत्याखाली पत्र लेखनाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘द व्हिजन अँड मिशन ऑफ इंडिया 2047’ या विषयावर विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पनेतील 2047 सालच्या भारताविषयीचे विचार नमूद केले. या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी भुसावळ विभाग डाक अधीक्षक उल्हास दुसाने, सहाय्यक डाक अधीक्षक अनुप गणोरे, निरीक्षक भूषण सैंदाणे, चौधरी ( यावल उपविभाग ), चोपडा पोस्टमास्टर अतुल बोरोले, पोस्टमन देवेंद्र पाटील यांचे या अनोख्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. शाळेतील शिक्षक आणि मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती या उपक्रमाच्या वेळी उपस्थित होत्या.