पाचोरा : प्रतिनीधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या काळात केंद्र सरकारच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आज शहरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेचे रॅलीद्वारे आवाहन करण्यात आले.
शहरातील गोसे हायस्कूल, नवजीवन विद्यालय जागृती विद्यालय या शाळेच्या माध्यमातून मुख्याध्यापक व शिक्षकांच्या आदेशाने शालेय विद्यार्थ्यांचे युनिफॉर्म मध्ये राष्ट्रध्वज हातात घेऊन भव्य रॅली काढण्यात आली.
या रॅलीमध्ये ‘हर घर तिरंगा’ होना चाहिये , भारत माते की जय, जवान जय किसान, झाडे लावा झाडे जगवा, अशा विविध देशभक्तीपर नारे देऊन घोषणा देत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये गोसे हायस्कूलचे विद्यार्थी, नवजीवन शाळेचे विद्यार्थी व जागृती शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.