गोड बोलणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांचे स्थापत्य अभियंत्याच्या निष्क्रियेकडे दुर्लक्ष

0
25

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी 

नगरपालिका कार्यक्षेत्रात नगरपरिषद यावल बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता योगेश मदने हे आपल्या बांधकाम विभागातील विविध कामे नियोजनपूर्वक तसेच मंजूर,प्लॅन, इस्टिमेट प्रमाणे ठेकेदाराकडून कामे करून न घेता,झालेल्या कामाची प्रत्यक्ष पाहणी व खात्री न करता ठेकेदारांना पूर्ण बिल अदा करण्याची कार्यवाही पूर्ण करीत असतात.तसेच शहरात खाजगी,व्यावसायिक सुरू असलेली बांधकामे काही परवानगी घेतलेली आहेत तर काही परवानगी न घेता सुरू आहेत,अनेक बांधकामे बांधकाम परवानगीनुसारच होता आहेत किंवा नाही याची खात्री स्थापत्य अभियंता करीत नसल्याने यावल शहरात सर्रासपणे अतिक्रमण करून अनधिकृत बांधकामे सुरू आहेत इत्यादी अनेक कामांमध्ये स्थापत्य अभियंता योगेश मदने यांचे दुर्लक्ष होत आहे याकडे गोड बोलणाऱ्या आणि शांत स्वभाव असलेले मुख्याधिकारी मनोज म्हसे यांच्यासह जिल्हाधिकारी जळगाव नगरपालिका विभाग जळगाव यांचे दुर्लक्ष होत असल्याने तसेच यावल शहरात अनेकांनी आपल्या सोयीसाठी वापरासाठी यावल नगरपालिकेच्या गटारी व रस्त्याच्या बांधकामात अडथळे निर्माण केले आहेत त्यांच्या विरोधात यावल नगरपालिकेने रीतसर नोटीसा देऊन कारवाई करण्याचे कळविले होते आहे परंतु अद्याप कारवाई न झाल्याने नगरपालिकेचे प्रभाव शून्य कामकाज असल्याने यावलकरांचे दुर्भाग्य आहे असे यावल शहरात बोलले जात आहे.
यावल नगरपरिषदे मार्फत साठवण तलाव,नवीन पाण्याची टाकी,नवीन पाईपलाईनचे काम, फालक नगर मधील ओपन स्पेस/ खुल्या जागेवरील बगीच्या वगळता इतर ठिकाणच्या खुल्या जागेवर जी बगीच्या बांधकामे झाली आहेत ती अत्यंत निकृष्ट प्रतीची झालेली असून पावसाळ्यात तर त्या बगीच्यां मध्ये पावसाचे साठणारे पाणी वाहून जात नसल्याने तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण होत आहे तसेच बगीच्यातील कामे सुद्धा निकृष्ट प्रतीची करण्यात आली आणि या कामाचे बोगस बनावट दस्तऐवज करून पूर्णत्वाचे दाखले ठेकेदारांना देऊन त्यांची बिले सुद्धा अदा करण्यात आली आहे ही बिले देताना संबंधितांना जास्तीत जास्त टक्केवारी मिळाल्याचे सुद्धा उघडपणे यावल शहरात बोलले जात आहे यावल नगरपालिकेतर्फे किरकोळ आणि ठराविक कामे ठराविक नेहमीच्या मजुरांना आणि ठेकेदारांनाच दिली जात असल्याने या ठेकेदारांचे वर्चस्व बांधकाम स्थापत्य अभियंता योगेश मदने यांच्यावर का व कशामुळे याची चौकशी मुख्याधिकारी मनोज म्हसे यांनी करायला पाहिजे? परंतु स्थापत्य अभियंता आणि ठेकेदार हे मुख्याधिकारी यांच्या गोड स्वभावाचा आणि वर्तनाचा गैरफायदा घेत असल्याचे बोलले जात आहे तरी याकडे जिल्हाधिकारी जळगाव यांनी आपले लक्ष केंद्रित करून तसेच यावल नगरपालिका तर्फे गेल्या पाच,दहा वर्षात जी विविध बांधकामे आणि खाजगी व्यावसायिक बांधकामे झालेली आहेत त्या कामांच्या चौकशीसाठी एक चौकशी समिती नियुक्त करून यावल नगरपालिकेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणावा आणि संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here