मेष-
दुपारनंतर वेळ चांगला राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमचा मुद्दा कोणावरही जबरदस्ती लादू नका.
वृषभ-
तुम्हाला विनाकारण राग येऊ शकतो. रागावर नियंत्रण ठेवा. भाग्य तुम्हाला साथ देईल. रखडलेली कामं पूर्ण होण्याचा योग आहे.
मिथुन-
खोट्या गोष्टींचा आज अवलंब करू नका. बाहेर जाताना गाडी अतिशय काळजीपूर्वक चालवा.
कर्क-
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमच्या आहाराची काळजी घ्या. करिअर बदलाचा योग आहे.
सिंह-
आजचा दिवस तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत घालवाल. संध्याकाळपर्यंत वेळ अनुकूल राहील. तसंच घरातील उत्तर दिशा स्वच्छ ठेवा.
कन्या-
नोकरीसाठी अर्ज करणं लाभदायक ठरेल. महत्त्वाचं काम संध्याकाळपर्यंत पूर्ण करा. गरजू लोकांना औषध दान करा.
तूळ-
तुमच्या नातेसंबंधात अडचणी येऊ शकतात. गरसमज वाढण्याआधी चर्चा करून मार्ग काढा.
वृश्चिक-
या राशीच्या व्यक्तींना आज भेटवस्तू मिळण्याचे योग आहेत. तसंच आजच्या दिवशी कोणत्याही अधिकाऱ्याशी वाद घालू नका. निर्णय हुशारीने घ्या.
धनु-
आजच्या दिवशी कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या घरी पाहुणे येतील. अडकलेले पैसे मिळू शकतात.
मकर-
आरोग्याची काळजी घ्या. तसंच घरातील वयोवृद्धांचा आशीर्वाद घ्या. तुमच्या मित्रांना मदत करा.
कुंभ-
तुमच्या गुरूचा आदर करा. कोणत्याही कामामध्ये घाई करून चूक करू नका. संध्याकाळपर्यंत समस्या दूर होतील.
मीन-
कोणतंही काम काम वेळेवर करण्याची सवय लावा. आजच्या दिवशी उधार दिलेले पैसे परत मिळतील. गरजू मुलांना मदत करा.