साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
पाचोरा तालुक्यातील डोंगरगावातील घटना याबाबत सविस्तर हकीगत अशी की,भीमाबाई पुंडलिक सावळे वय ७० राहणार डोंगरगाव,तालुका पाचोरा जिल्हा जळगाव यांना दोन मुले व तीन मुली असून त्यांची मोठी मुलगी भगवान राणा ढमाले खेडगाव (नदीचे) येथे दिली आहे व दोन नंबरची मुलगी सोयगाव येथे राजेंद्र हरी गाडेकर यांना दिली आहे.
व तीन नंबरची सर्वात लहान मुलगी सुभाष रामभाऊ मनगटे यांना दिली असून, दोन नंबरची मुलगी ही मागील वर्षी कोरोना झाल्याने तिचं निधन झालं. त्यांचा मोठा मुलगा धनराज पुंडलिक सावळे हे शेती काम करतात व लहान मुलगा आत्माराम पुंडलिक सावळे हे एस टी महामंडळ येथे ड्रायव्हर म्हणून पाचोरा एसटी डेपोत नोकरीस आहे. भिमाबाई यांची डोंगरगाव येथे १८ एकर २० आर अशी बागायती जमीन आहे. त्यांचे दोघं मुलं त्यांना म्हणाले की, आता तुम्ही म्हातारे झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला सोसायटी किंवा बँक कर्ज काढणे करिता पाचोरा येथे जाणे अवघड होईल म्हणून तुमच्या नावावरील जमीन आमच्या दोघा भावांच्या नावावर करून द्या असे म्हणून सावळे दाम्पत्यांनी मुलांवर विश्वास ठेवून दोघा भावांच्या नावावर संपूर्ण जमीन करून दिली पण काही दिवसातच त्यातील दीड एकर जमीन १३ लाख रुपयात व पाचोरा येथील राहते घर १८ लाख रुपयात विकून दोघं भावांवरील झालेले कर्ज काही प्रमाणात फेडून टाकले.
त्यानंतर दोघा भावांमध्ये आपसात भांडणे सुरू झाली, मागील दोन वर्षांपूर्वी ते वेगळे निघून त्यांच्यावर सरकारी व सावकारीचे ४५ लाख रुपये कर्ज आहे त्यांनी ते दोघांनी अर्धे अर्धे वाटून घेतले व भिमाबाई व त्यांच्या पतीला सांभाळण्यासाठी त्यांच्या मोठा मुलगा याने दीड एकर जमीन जास्त घेतली. परंतु तो काही दिवसा नंतर लहान भावाला म्हणाला की तुला नोकरी आहे करिता तू आईला सांभाळ व मी वडिलांना सांभाळतो असे म्हणून लहान भावाकडे भीमा बाईला सोडून दिले तेव्हापासून भिमाबाईला त्यांचा लहान मुलगा त्याची पत्नी त्यांच्या मुलगा अतोनात त्यांचा छळ करीत आहे.
त्यांना जेवण सुद्धा दिले जात नाही, त्यामुळे काही दिवस भिमाबाई मोठ्या मुलीच्या मुलाकडे चार-पाच महिने राहिली परंतु त्या स्वाभिमानी असल्यामुळे त्या म्हणाल्या की मी असं किती दिवस दुसऱ्याकडे राहू, म्हणून परत त्या लहान मुलाकडे गेल्या परंतु त्याने घरात घेतले नाही म्हणून त्यांचा नातु यास म्हणाल्या की मला माझ्या मूळ गावी डोंगरगाव येथे सोडून दे तेव्हा त्यांचा मोठा मुलगा यास भीमा बाईचा नातू ने सांगितले मी आजीला आणून सोडतो त्या वेळेला तो म्हणाला माझ्याकडे आणू नको तिकडे कुठे रेल्वे स्टेशनवर सोडून दे त्यावेळेस आजी म्हणाल्या मी गावात भीक मागून खाईल माझं गाव आहे परंतु तिथे गेल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा सून नातू यांनी भिमाबाई यांना अजून जास्त शिवीगाळ करून कोणी शेजारी त्यांना खाण्यापिण्या दिले तर त्यांना पण तो शिवीगाळ करत असे त्यामुळे गावातील लोक त्यांच्या धाकामुळे भीमाबाई भिक पण देत नसे अजूनही त्याचा अतोनात छळ सुरू आहे. कधी कधी तर त्यांना पोट भरण्यासाठी रस्त्यावर भीक मागवं लागतं. जर भीक मिळालं नाही तर शेजारीपाजारी त्यांना खाऊ पिऊ घालतात. करोडो रुपयांचे प्रॉपर्टी असून सुद्धा भीमाबाई व त्यांचे पती जेवणाला पारखे झालेले आहे.
त्यामुळे पाचोरा तालुक्यातील या कुटुंबाबद्दल चर्चा सुरू असून काही स्वयंसेवी संस्था उपविभागीय अधिकारी पाचोरा यांना निवेदन देऊन भिमाबाई व त्यांच्या पतीने केलेली मुलांवर जमीनीचं खरेदी खत रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. या अगोदरही अमळनेर येथील अशाच मुलांनी आपल्या आई-बाबांचा छळ केल्यामुळे उपविभागीय अधिकारी अंमळनेर यांनी मुलांच्या नावावर केलेले प्रॉपर्टीच खरेदीखत रद्द केलेलं आहे. साप्ताहिक मानव हित देखील या घटनेचा निषेध करीत आहे असे आईच्या दुधाशी गद्दारी करणाऱ्या मातृद्रोही मुलांवर कठोरात कठोर शासन केले पाहिजे, त्याचबरोबर त्यांची संपूर्ण प्रॉपर्टीचं खरेदीखत रद्द करून पुन्हा भिमाबाई व त्यांच्या पतीच्या नावे झालं पाहिजे याबाबत मुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन कडक कारवाई करावी अशी अपेक्षा लागून आहे