डॉ.पाकिजा पटेल ‘ग्लोबल ह्युमॅनिटीरियन अवार्ड’ पुरस्काराने सन्मानित

0
25

अमळनेर ः प्रतिनिधी
आदर्श गाव राजवड (ता. पारोळा) येथील मुख्याध्यापिका समाजसेविका राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त डॉ. पाकिजा उस्मान पटेल यांना ‘मानस चॅरिटेबल ट्रस्ट अहमदाबाद’ या संस्थेकडून ‘ग्लोबल ह्युमॅनिटीरियन अवार्ड’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ.पाकिजा पटेल यांची शैक्षणिक सामाजिक कार्याची भरारी पाहता तसेच त्यांना नुकतीच युरोप कडून डॉक्टरेट या मानद उपाधीने सन्मानित केले असल्याने तसेच देशभरातून कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र मिळाल्याने त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार बहाल करण्यात आला. उपक्रमशील शिक्षिका, शैक्षणिक गुणवत्ता, नाविन्यपूर्ण प्रयोग, पर्यावरण, सर्व भौतिक डिजिटल वर्ग, संस्कारक्षम शिक्षण, अ श्रेणीतील जिल्ह्यातील नामांकित शाळा, या बाबींचा समावेश असल्याने डॉ. पाकिजा पटेल यांना पुरस्कार प्राप्त झाला. स्पर्धात्मक शिक्षणावर त्यांचा नेहमी कल असतो. विद्यार्थी हे दैवत मानून विद्यादानाचे उल्लेखनीय कौतुकास्पद कार्य केल्याने त्यांच्या पुरस्कारांमध्ये भर पडली आहे. या राष्ट्रीय पुरस्कारामुळे राजवड गावात जल्लोषाचे वातावरण आहे डॉ. पाकिजा पटेल यांच्या या कामगिरीने सर्वत्र सत्कार होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here