शहरात उद्या व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅली

0
22

जळगाव : प्रतिनिधी

वन्यजीव संरक्षण संस्था, वन विभाग जळगाव, यावल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे जागतिक व्याघ्र दिनाच्या पार्श्‍वभूमीवर मानव वन्यजीव संघर्ष टाळणे, व्याघ्र संवर्धनासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. या अनुषंगाने 28 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून व्याघ्र संवर्धन जनजागृती मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे तसेच वन्यजीवचे व्याघ्रदूत ‘वाघ वाचवा’चा संदेश देत गावागावात जनजागृती करणार आहे
कार्यक्रमास जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य वनसंरक्षक डिगंबर पगार, पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, जळगाव उपवनसंरक्षक विवेक होशिंग, यावल उपवनसंरक्षक एच. एस. पद्मनाभा, टायगर कॉन्झर्वेशन ॲण्ड रिसर्च सेंटर मुंबईचे प्रसाद हिरे, स्टँडिंग फॉर टायगर फाउंडेशनचे रवींद्र मोहोड सहभागी होणार आहेत. आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या हस्ते व्याघ्रदूतांचा सन्मान करण्यात येणार असल्याचे कार्यक्रम सयोजक रविंद्र फालक, बाळकृष्ण देवरे यांनी कळविले आहे.
वाघांची वेशभूषा, मुखवटे घातलेले व्याघ्रदूत, वाघ असलेले सजवलेले रेस्क्यू वाहन, विनोद ढगे यांचे करूया वाघाचे रक्षण पथनाट्य आणि मानव वन्यजीव संघर्ष टाळण्या संदर्भातील माहिती पत्रके हे या वर्षीच्या जनजागृती रॅलीचे खास आकर्षण असणार आहे. यंदा जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, वाशीम, शिर्डी येथून व्याघ्रदूत या महारॅलीत सहभागी होणार आहे. 28 जुलै रोजी जळगाव, भुसावळ, वरणगाव, मुक्ताईनगर या ठिकाणी जनजागृती केली जाईल. 29 जुलै जागतिक व्याघ्र दिनी डोलारखेडा, चारठाणा, वायला दुई, सुकळी, राजुरा परिसरातील गावात पथनाट्य सादर करत ‘मानव वन्यजीव संघर्ष बचाव आणि वाघ वाचवा’ या विषयांवर जनजागृती करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here