मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांच्या महामुलाखतीचा दुसरा भाग आज शिवनेसेचे(Shivsena)मुखपत्र असलेल्या सामनामध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजपवर(BJP) हल्लाबोल केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.भाजपमधील नाराजीबद्दलही त्यांनी उघडपणे मत मांडले.
भाजप पक्षातील क्षातले जुनेजाणते निष्ठावान, त्यावेळी आमच्या बरोबर युतीत असणारे अनेक नेते आजही माझ्या संपर्कात आहेत. पण ते निष्ठेने भाजपसोबत आहेत. मात्र भाजपचे ते निष्ठावान नेते शिवसेनेत येणार असा पोकळ दावा मी करणार नाही. मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत. पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपचे काम करत आहेत, असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला .बाहेरच्या माणसांना सर्व दिलं जातंय. त्यांच्या डोक्यावरती बाहेरची माणसे बसवली जात आहे. तरीही ते निष्ठा म्हणून काम करीत आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. माझ्या मनात पाप नव्हतं. मी तुम्हाला बोलवत होतो की, माझ्यासमोर येऊन बसा, बोला, मात्र शिंदे गटाने तसे केले नाही.
2019 साली भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही. शिवसेनेचे उमेदवार पाडण्यासाठी याच आमदारांविरुद्ध भाजपने त्यांचे बंडखोर उभे केले होते , असे याच आमदारांचे म्हणणे आहे. त्यांचेच अनुभव आहेत. म्हणजे भाजपला तेव्हा आणि आताही शिवसेना संपवायचीच होती. त्यांच्याबरोबर हे गेले,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे आणि भाजप सरकारवर केली आहे.