कारगिल विजय दिनाचे स्मरण करणे आवश्यक– तहसीलदार रमेश जसवंत

0
25

साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद, जिल्हा प्रशासन, औरंगाबाद व संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव तर्फे कारगिल विजय दिनानिमित्त रॅली, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, मार्गदर्शन, लसीकरण कॅम्प, शहीदांच्या कुटुंबाचा सत्कार कार्यक्रम मंगळवारी संपन्न झाला.

‘कारगिल युद्धात शहिदांना मार्गदर्शन करतांना उपस्थितीत विद्यार्थ्यांना म्हणाले, झालेल्या अमर जवानांच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिवसाचे स्मरण करणे आवश्यक आहे’ असे प्रतिपादन तहसिलदार, रमेश जसवंत यांनी केले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत येणा-या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय-औरंगाबाद, जिल्हा प्रशासन औरंगाबाद व संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २६ जुलै २०२२ मंगळवारी कारगिल दिनानिमित्त संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव, जिल्हा-औरंगाबाद येथे आयोजित विशेष प्रचार कार्यक्रमात रमेश जसवंत बोलत होते. पुढे ते म्हणाले आपण ज्या समाजात राहातो त्या समाजाचे आपण देणे लागतो व त्यासाठी आपण अश्या बलिदानाला स्मरण करणे आपले कर्तव्य आहे. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा, आशाबी तडवी, गटविकास अधिकारी, प्रकाश नाईक, केंद्रीय संचार ब्यूरो, औरंगाबादचे प्रबंधक संतोष देशमुख, संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगावचे प्राचार्य, डॉ. गणेश अग्निहोत्री, उप प्राचार्य, डॉ. शिरीष पवार, कनिष्ठ विभाग प्रमुख, आर. आर. खडके, कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुल, सोयगावचे मुख्याध्यापक, ज्ञानेश्वर एलीस, आरोग्य अधिकारी, डॉ. निरगुडे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी प्रकाश नाईक यांनी हर घर तिरंगा अभियान गावात कसे पोहोचवता येईल याची माहिती दिली व कार्यक्रमाच्या शेवटी गणेश अग्निहोत्री यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष देशमुख यांनी तर सूत्रसंचालन अनिल मानकर यांनी केले व आभार प्रदर्शन सहा. क्षेत्रीय प्रचार अधिकारी, प्रदीप पवार यांनी केले. यावेळी शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली व कारगिल युद्धात शहीद झालेल्या विष्णु हरी चव्हाण यांचे वडील हरी चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.दरमयान सुरुवातीला वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात रांगोळी, वक्तृत्व व निबंध स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिक तसेच प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाविद्यालय, सोयगाव, औरंगाबाद आणि कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुल, सोयगाव चे विद्यार्थी व कर्मचारी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपस्थितांना हर घर तिरंगा अभियान चे माहितीपर पत्रक वाटण्यात आले. यावेळी आझादी का अमृत महोत्सवच्या अंतर्गत मोफत लसीकरणाचे आयोजनही करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवदर्शन शाहिरी संच, औरंगाबाद तर्फे देशभक्ती पर गीतांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या आधी शहराच्या बस स्टॅन्ड पर्यंत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते व समापन राष्ट्रगिताने करण्यात आला. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणानी परिसर दणाणला होता.या विशेष प्रचार कार्यक्रमाच्या यशस्विते करिता केंद्रीय संचार ब्यूरो चे प्रदीप पवार, प्रिती पवार, राहुल मोहोड आणि प्रभात कुमार व संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव, औरंगाबाद आणि कै. बाबुरावजी काळे मराठी स्कुल, सोयगाव चे पदाधिकारी व कर्मचारी आदिंनी परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here