पुन्हा राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल – उद्धव ठाकरेंना विश्वास

0
47

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी व्यक्त केला. इतकेच नाही तर मुंबई महापालिकेवरही शिवसेनेचाच भगवा फडकेल, असेही ते म्हणाले. ‘सामना’ला(Samanna) दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजप(BJP) आणि शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रदर्शित कारण्यात आला .

महाविकास आघाडीचा प्रयोग चुकला नाही. लोकांनी स्वागतच केले. ‘वर्षा’(Varsha) सोडून जाताना महाराष्ट्रात अनेकांनी अश्रू अनावर झाले. कोणत्या मुख्यमंत्र्यांना असे प्रेम मिळाले? त्या अश्रूंचे मोल मी वाया जाऊ देणार नाही , असेही उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांना मी आपले मानले, तीच माणसं सोडून गेली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. देशात ईडी सीबीआयचा गैरवापर करून विरोधकांना फसविण्यात येत आहे.

लोकशाहीचा अर्थ असा नाही की, प्रत्येक वेळी विजय मिळेल. शिवसेना, काँग्रेस, भाजप कुठलाही पक्ष असो नेहमी प्रत्येकाला विजय मिळेलच असे नाही. नवीन पक्ष उदयाला येत असतात. तेही काही काळ चमकून जातात. हीच तर लोकशाहीची वेगळी गंमत आहे. बाळासाहेबांच्या पुत्राला मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीतून खाली उतरवले? का तर म्हणे हिंदुत्व वगैरे, काँग्रेस-राष्ट्रवादी नको. ठीक आहे, पण आजच्या मुख्यमंत्र्यांची भरसभेतही नाटके पाहा.भाजप किती भयंकर म्हणून त्यांनी भरसभेत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. ती क्लिप फिरतेय. भाजप कसा शिवसैनिकांवर अन्याय-अत्याचार करतो यासंदर्भात ती क्लिप आहे. माझ्याच समोर त्यांनी तो राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे म्हणाले, प्रत्येकाच्या पापाचा घडा भरत असतो. उद्या हे महाशय स्वत:ला नरेंद्रभाई मोदी समजतील आणि पंतप्रधानपदावर दावा त्यामुळे भाजपवाल्यांनो, सावधान , असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

माझ्यासाठी म्हणाल तर, सत्ता असली काय आणि नसली काय, काहीच फरक पडत नाही. अटलबिहारी वाजपेयीजी एकदा बोलले होते, ‘सत्ता आती है, जाती है. लेकीन देश रहना चाहिये , असे उद्धव ठाकरे म्हणाले. देशात महागाई आणि बेरोजगारीचे संकट आहे. या सर्व गोष्टींकडे कुणाचे लक्ष नाही. थातूरमातूर मलमपट्टी केली जाते, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here