कामाची आणि खर्चाची मुदत संपल्यावर सुद्धा म्हैसवाडी प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम अपूर्णच

0
22

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र बांधकामाची आणि खर्च करण्याची मुदत 31 मार्च 2022 रोजी संपलेली असताना आज सुद्धा बांधकाम अपूर्णच असल्याने बांधकाम विभाग जिल्हा परिषद जळगाव कार्यकारी अभियंता आणि रावेर जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता यांच्यावर जिल्हा परिषद सदस्यांचा आणि संबंधित ठेकेदार यांचा प्रभाव असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या बांधकामावरून ग्रामस्थांना दिसून येत असल्याने यावल रावेर तालुक्यात याबाबत जोरदार चर्चा सुरू असली तरी ग्रामस्थांनी 6 जून 2022 रोजी केलेल्या तक्रारी नुसार रावेर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता आणि जिल्हा परिषद जळगाव बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता काय कारवाई करणार याकडे म्हैसवाडी ग्रामस्थांसह संपूर्ण यावल तालुक्याचे लक्ष वेधून आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्हा परिषद जळगाव बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांनी दि.22/9/2021 रोजी ठेकेदार गजानन मधुकर सोनार यांना म्हैसवाडी तालुका यावल येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मुख्य इमारत बांधकाम करणे संदर्भात एक कोटी 21 लाख 28 हजार 543 रुपयाचा कार्यारंभ आदेश दिला होता आणि आहे, या आदेशात नमूद केल्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग रावेर यांच्या सूचनेनुसार दिलेल्या अटी शर्तीनुसार आणि मार्गदर्शनाखाली बांधकाम करण्याची सूचना देऊन काम मुदतीत पूर्ण करावे तसेच कार्यारंभ आदेश दि.पासून निविदा अटी व शर्ती प्रमाणे कामाची समयबद्य प्रगती ठेवणे बंधनकारक राहील असे नमूद करून कामाची मुदत सहा महिने राहील, कामाचे खर्चाची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत राहील असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. परंतु आज दि.26 जुलै 2022 पर्यंत म्हैसवाडी येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम अपूर्ण आहे तसेच बांधकामाच्या जागेत बदल केल्याने तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे झालेले आणि होत असलेले बांधकाम मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे होत नसल्याची तक्रार म्हैसवाडी ग्रामस्थांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता आणि म्हैसवाडी ग्रामपंचायतकडे लेखी स्वरूपात केलेली होती . त्यानुसार जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांनी दि.24 जून 2022 रोजी रावेर येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागीय अभियंता वानखेडे यांना लेखी पत्र देऊन म्हैसवाडी येथे सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे काम इस्टिमेट नुसार होत नसलेल्या कामाबद्दल म्हैसवाडी येथील ग्रामस्थांनी तक्रार केली आहे त्यानुसार आपण समक्ष कामा ठिकाणी भेट देऊन सदर कामाचे फोटो पाहणी अहवाल व कामाची सद्यस्थिती संबंधित कार्यालयास सात दिवसाच्या आत तात्काळ सादर करावी अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामास आपणास जबाबदार देण्यात येईल असे कळविले होते.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपविभागीय अभियंता यांनी कार्यकारी अभियंता यांच्या सूचनेनुसार प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन काय पाहणी केली आणि कोणता अहवाल सादर केला आहे किंवा नाही?
याबाबत म्हैसवाडी येथील ग्रामस्थ किरण गोपाळ पांडव यांनी याबाबत माहिती अधिकारात माहिती मागितलेली असताना त्यांना अपूर्ण माहिती देण्यात आली त्यांना मागितलेली पूर्ण माहिती संबंधित विभागाने का दिली नाही? हा सुद्धा प्रश्न उपस्थित केला जात असून काही ठराविक जिल्हा परिषद सदस्यांचे यावल आणि रावेर तालुक्यातील कट्टर समर्थक असलेल्या ठेकेदारांनाच कामे मिळत असल्याने आणि ती कामे मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे होत नसल्याने यावल तालुक्यातील किनगाव परिसरात आणि यावल तालुक्यातील साकळी, अट्रावल, फैजपूर, आणि रावेर तालुक्यातील त्या ठराविक ठेकेदारांच्या होत असलेल्या अनेक निकृष्ट कामांबाबत तसेच काही ठेकेदार म्हणतात की , आम्हाला कामे मंजूर करून घेण्यासाठी संबंधित यंत्रणेला आधी टक्केवारी द्यावी लागते त्यानंतरच कामे मंजूर होतात वाजवीपेक्षा जास्त टक्केवारी वाटप होत असल्याने होणाऱ्या कामांमध्ये अनियमितपणा आणि गुणवत्तेचा अभाव निर्माण होत असतो असे ठेकेदार आणि त्यांच्या मुजूर वर्गात उघडपणे बोलले जात असल्याने यावल रावेर तालुक्यातील जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यां निकृष्ट प्रतीच्या बांधकामाकडे यावल, रावेर तालुक्याचे पूर्व आणि पश्चिम विभागातील अनुक्रमे आमदार शिरीषदादा चौधरी आणि आ. लताताई सोनवणे यांनी व ज्या त्या गटातील जिल्हा परिषद सदस्यांनी आपले लक्ष केंद्रित करून निकृष्ट प्रतीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर गुण नियंत्रक/क्वालिटी कंट्रोल तसेच संबंधित अधिकाऱ्यां मार्फत कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here