रेशन कार्ड धारकांची भटकंती भीम आर्मी आंदोलन छेडणार

0
37

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
स्वस्त धान्य दुकानातून रेशन कार्डधारकांना स्वस्त धान्य घेण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने तसेच तालुक्यातील अनेक रेशन दुकानदार पुरवठा विभागाच्या अटी शर्तीच्या भंग करीत असल्याने तसेच यावल तहसीलदार महेश पवार यांच्यासह पुरवठा निरीक्षक हे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने यावल तालुका भीम आर्मी लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे तालुकाध्यक्ष यांनी प्रवीण डांबरे सांगितले.

यावल तालुक्यात ग्रामीण भागात व शहरी भागात अनेक स्वस्त धान्य दुकानदारांना शासनातर्फे धान्य पुरवठा मिळाल्यानंतर काही स्वस्त धान्य दुकानदार आपल्या दुकानात निश्चित अशा वेळेवर उपस्थित राहत नसल्याने तसेच स्वस्त धान्य दुकानात प्रत्येक रेशन कार्ड धारकास किती धान्य मिळणार? दुकानात उपलब्ध धान्य साठा किती? धान्य वाटपचे प्रमाण काय?धान्याचे दर काय ? मागील महिन्याचा धान्यसाठा शिल्लक किती इत्यादी बाबतची माहिती माहिती फलकावर नमूद नसल्याने अनेक ग्राहक संभ्रमात पडले आहेत. स्वस्त धान्य दुकानात तक्रार पुस्तक उपलब्ध राहत नसल्याने तसेच अनेक रेशन कार्ड धारकांना आपल्याला धान्य किती मिळाले? त्याचे प्रमाण काय होते? याबाबतची रीतसर पावती मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित करून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

यावल तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक महिला अधिकारी असल्याने तालुक्यात पुरवठा निरीक्षक प्रत्येक रेशन दुकानाला प्रत्यक्ष भेटी केव्हा देतात किंवा नाही? यावल तहसील कार्यालयात पुरवठा विभागातच स्वस्त धान्य दुकानदारांचे दप्तर बोलावून कार्यवाही पूर्ण केली जाते का? यावल तालुक्यातील अनेक रेशन कार्डधारकांना आपल्या रेशन कार्डात नमूद सदस्य संख्येनुसार वाजवीपेक्षा जास्त गहू तांदूळ दर महिन्याला काही मोफत आणि काही शासकीय दरानुसार मिळत असल्याने तो गहू तांदूळ ते काही ग्राहक सर्रासपणे बाजारात किरकोळ फिरते विक्रेत्यांना विकत असल्याने त्यांच्यावर सुद्धा कार्यवाही होत नसल्याने इत्यादी बाबतची सखोल चौकशी होऊन कार्यवाही होण्यासाठी यावल तालुका भीम आर्मी तालुकाध्यक्ष प्रवीण डांबरे हे लवकरच आंदोलन छेडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here