कजगाव येथे अखंड हरिनाम कीर्तन सप्ताहाचे आयोजन

0
41

साईमत लाईव्ह कजगाव ता भडगाव प्रतिनिधी

कजगाव ता भडगाव येथे दिनांक २१ पासून ते २८ रोजी पर्यंत अखंड हरीनाम कीर्तन सप्ताहला सुरुवात होत आहे
जीन परीसरातील संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे सात दिवस चालणाऱ्या अखंड हरीनाम कीर्तन सप्ताह चे आयोजन संत सावता महाराज माळी समाज मंडळांच्या वतीने करण्यात आले आहे सकाळी ५ ते ६ काकडा आरती सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ व रात्री ९ ते ११ वाजेपर्यंत कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
दिनांक २१ रोजी हरी भक्त पारायण कोमलसिंग महाराज सुरानेकर २२ रोजी हभप प्रमेश्वर महाराज गोडखेडेकर २३ रोजी हभप रवींद्र महाराज वरसाडेकर २४ रोजी हभप रविंद्र महाराज गोतानेकर २५ रोजी हभप यशवंत महाराज कमळगावकर २६ रोजी हभप मच्छीद्र महाराज वाडीभोकर २७ रोजी अंतरावर महाराज बोरकुंडकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच २८ रोजी सकाळी ९ते११ वाजेपर्यंत हभप अनंतराव महाराज बोरकुंडकर यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे व कीर्तन समाप्ती नंतर महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भाविकांनी कीर्तन सोहळ्याचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here