यावल शहरातील समस्यांकडे जिल्हाधिकारी यांच्यासह यावल नगरपरिषदचे दुर्लक्ष

0
17

साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी

यावल नगरपरिषद हद्दीत 90 टक्के भागात प्रमुख रस्त्यांवर आणि प्रभागातील ठिक ठिकाणच्या रस्त्यांवर नगरपरिषदेच्या चुकीच्या नियोजनामुळे ठिकठिकाणी अनधिकृत गतिरोधक तसेच खड्डे निर्माण झाले आहेत,यासह इतर अनेक मूलभूत नागरी समस्यांकडे जिल्हाधिकारी जळगाव नगरपरिषद विभाग,तसेच यावल नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप यावल शहरातून होत आहे,काही संघटनांचे सुद्धा लोकप्रतिनिधींशी असलेले हितसंबंध लक्षात घेता विरोधक आणि सत्ताधारी गटातील काही लोकप्रतिनिधी मूलभूत सुविधांसाठी आवाज उठवायला तयार नाही हे यावलकरांचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.

यावल शहरात विकसित भागात कोट्यावधी रुपये खर्चून नवीन पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले त्यानंतर पाणीपुरवठा होण्यासाठी नवीन पाईपलाईन सुद्धा टाकण्यात आली परंतु ही पाईपलाईन टाकताना संबंधित ठेकेदाराने संबंधित यंत्रणेला टक्केवारी वाटप करून त्याच्या सोयीनुसार पाईपलाईनचे काम केल्याने त्या वेळेला विकसित भागातील संपूर्ण रस्त्यांचे गाडरस्त्या मध्ये रूपांतर झाले,जागोजागी खड्डे निर्माण झाले लोकांना वाहने चालवणे आणि पायदळ चालणे मुश्किल झाले त्यात पुन्हा नवीन पाईपलाईन मधुन पाणीपुरवठा होत नसल्याने पाईपलाईन दुरुस्तीसाठी पुन्हा जागोजागी खड्डे खोदण्यात आले दुरुस्ती केल्यानंतर पडलेले खड्डे व्यवस्थित बुजविण्यात न आल्याने विकसित भागातील नागरिकांना आपली वाहने चालविताना आणि पायदळ चालताना मोठे अडथळे निर्माण होत आहे त्याच प्रमाणे संपूर्ण यावल शहरात प्रमुख रस्त्यावर आणि विकसित भागातील संपूर्ण रस्त्यांवर अनधिकृतपणे ठिकठिकाणी मोठमोठे गतिरोधक टाकण्यात आले,अपघात होऊ नये म्हणून गतिरोधक ही आवश्यक बाब असली तरी गतिरोधक साठी परवानगी आवश्यक असून नियमानुसार गतिरोधक झालेले नाहीत याकडे आणि काही ठिकाणी खोल खड्डे निर्माण झाले आहेत.

त्याकडे यावल नगरपरिषद बांधकाम शाखा अभियंता आणि पाणीपुरवठा विभाग प्रमुख तसेच मुख्याधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे यांच्याकडे तक्रारी करून सुद्धा आठ आठ,पंधरा पंधरा दिवस साधा एक दोन फुटाचा खड्डा सुद्धा बुजला जात नाही गेल्या आठवड्यात फालकनगर परिसरात असलेल्या स्वामी समर्थ केंद्राजवळ पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी भर रस्त्यात मोठा आडवा खड्डा खोदण्यात आला तो खड्डा खोदून चार दिवस पाणीपुरवठा पाईपलाईनचे काम केले नाही चार-पाच दिवसानंतर काम केल्यानंतर त्या ठिकाणी खड्डा बुजवीतांना व्यवस्थित न बुजविल्याने संपूर्ण परिसरातील लोकांना येण्या जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण होत आहे याकडे यावल नगरपालिकेचे जाणून-बुजून दुर्लक्ष होत असून संबंधित ठेकेदार कामगार कोणत्या पद्धतीने काम करतात हे सुद्धा यावल नगरपरिषद बांधकाम विभाग पाहिला तयार नाही टक्केवारी ठरलेली असल्याने कामाचे बिल तात्काळ ठेकेदाराला अदा केली जातात परंतु काम कसे केले? काय केले? याची प्रत्यक्ष पाहणी बांधकाम विभाग करायला तयार नाही यावल शहरात आता जागोजागी मोकाट जनावरे भर रस्त्यावर उभी राहत असल्याने याकडे सुद्धा यावल नगरपालिकेचे दुर्लक्ष आहे.

गटारीतील पाणी वाहून जात नसल्याने किंवा ठिकठिकाणी गटारी फुटलेल्या नादुरुस्त असल्याने भर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाला आहे अतिक्रमणामुळे वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होत आहे आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असल्याने त्याच ठिकाणी आठवडे बाजार भरत असल्याने संपूर्ण यावल शहरात साथीचे आजार पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तसेच बाजाराची जागा अपूर्ण पडत असल्याने आठवडे बाजार सुद्धा अनधिकृत पणे यावल शहरात दोन ठिकाणी भरला जात आहे यावल शहरात अनेकांची नवीन इमारती व घरांची बांधकामे दुरुस्ती सुरू असल्याने भर रस्त्यावर बांधकाम साहित्य पडून राहत असल्याने मोठे अडथळे निर्माण होत असतात इत्यादी अनेक समस्यांकडे यावल नगरपरिषद प्रशासनाचे पर्यायी जिल्हाधिकारी नगरपरिषद विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

याकडे स्वतः जिल्हाधिकारी जळगाव यांनी लक्ष केंद्रित करून यावल नगरपालिकेला प्रत्यक्ष भेट देऊन यावल शहरातील विविध भागाची पाहणी करून यावल नगरपालिकेची चुकीची व बोगस झालेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करून संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here