किल्ले राजदेहरे दुर्गसंवर्धन मोहीम संपन्न दगड मातीने बुजलेले पाण्याचे टाके केले मोकळे

0
50
साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनिधी
सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगाव च्या वतीने तालुक्यातील राजदेहरे येथील पुरातन ऐतिहासिक किल्ल्यावर रविवार दिनांक १७ जुलै रोजी दुर्गसंवर्धन मोहीम घेण्यात आली असून या मोहिमेत जवळपास 30 दुर्गसेवक दुर्गसेविकांनी सहभाग घेऊन किल्ल्यावरील दगड मातीच्या भरावाने बुजले गेलेले पुरातन पाण्याचे टाके सर्व दगड आणि माती काढून पुन्हा मोकळे करण्यात आले तसेच किल्ल्यावर असलेला प्लास्टिक कचरा जमा करून नष्ट करण्यात आला.
या किल्ल्यावर पुरातत्त्व विभाग व वनविभागाच्या परवानगीने पुढील जे कामे करता येतील त्यासाठी संपूर्ण किल्ल्याची पाहणी करून नोंदी देखील घेण्यात आले आहेत लवकरच या किल्ल्यावर स्थानिक राजदेहरे येथील निर्भय सेवा मिशन व सह्याद्री प्रतिष्ठानचे वतीने पुरातत्त्व विभाग व वनविभागाच्या परवानगीने मोठ्या प्रमाणावर दुर्गसंवर्धन मोहीम घेण्यात येणार आहे सदर माहिती सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे संपर्कप्रमुख प्रकाश नायर उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख शुभम चव्हाण प्रशासक गजानन मोरे विनोद शिंपी रविंद्र सुर्यवंशी रविंद्र दुसिंग अरुण आजबे अनिल कुडे संदीप वराडे सुतार सर यश राजपूत कपील कुमावत चेतना भागवत मुकूल भागवत कोमल भागवत अथर्व शिरुडे हर्षल पाटील प्रणव बागडे अथर्व देव तसेच राजदेहरे येथील निर्भय सेवा मिशनचे अंकुश राठोड पवन राठोड अमोल राठोड निमिचंद राठोड वासुदेव राठोड श्याम मोरे योगेश जाधव अमोल चव्हाण आदींचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here