साईमत लाईव्ह यावल प्रतिनिधी
यावल तालुक्यात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग असून त्यांना स्वस्त धान्य मिळणे है अतिशय आवश्यक आहे.परंत् शासनाने स्वस्थ धान्य कपात करून गोरिगरीबावर उपासमारीची वेळ आणलेली आहे.त्या करिता शासनाने स्वस्त धान्य कपातीचे निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी निळे निशान सामाजिक संघटनेतर्फे यावल तहसीलदार यांना निवेदन देऊन केली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील बेघर भूमिहीनांना तात्काळ ग्रामपंचायतीने रहिवास प्रयोजनार्थ जागा उपलब्ध करून
किवा गोरगरीब गरजू कुटुंब ज्या जागी वास्तव्यास असतील त्या जागा नियमीत करून ग्रामपंचायत नमुना नं.8ला नोंद करण्यात यावी.आमच्या मागण्या या जनहिताच्या असून तात्काळ आपण मार्गी लावून गोरगरिवांना न्याय द्यावा अन्यथा संघटनेच्या वतीने आंदोलनात्मक भूमिका घेण्यात येईल याची नोंद घ्यावी निवेदनावर रोजगार आघाडी जळगाव जिल्हा अध्यक्ष युवराज सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष अशोक गोवर्धन तायडे जिल्हा कार्याध्यक्ष विनायक भगवान साळके,युवा तालुका अध्यक्ष विलासभाऊ भास्कर,यावल तालुका अध्यक्ष संजय तायडे, यावल-रावेर विधानसभा क्षेत्र प्रमुख भीमराव गजरे,शहर अध्यक्ष राहुल तायडे,तालुका उपाध्यक्ष भूषण योगराज सपकाळे,शे.संखावत शे.सिकंदर तालुका संघटक,तुषारभाऊ तायडे,सुभाष तायडे अट्रावल ग्रा.पं.सदस्य यांची स्वाक्षरी आहे.