खाकी वर्दीत ही जपले सामाजिक भान

0
10

 

साईमत लाईव्ह ओझर प्रतिनिधी

पोलिस म्हटले की,खाकी वर्दीतील तापट स्वभावाचा,कडक शब्दात बोलणारा,हेकेखोरअसंवेदनशील व्यक्ती अशीच प्रतिमा सर्वसामान्यांच्या मनात असते.त्यामुळे अनेकजण पोलिसांपुढे जाण्यास घाबरतात. पोलिस म्हटले की,इतका धाक हवाच. पोलिसांना कर्त्यव्यासाठी वेळप्रसंगी थोडे कठोर व्हावे लागते.असे असले, तरी या वर्दीतही मनुष्य असतो, त्यालाही मन,भावना असतात. ड्युटीसाठी कठोर बनलेला हा वर्दीतील माणूस वेळप्रसंगी मनाने तितकाच मृदू होतो.असाच काहीसा अनुभवला गेलाय.

घराघरात श्रद्धेने जपली जाणारी आषाढी एकादशी व मुस्लीम धर्मात कर्तव्य म्हणून साजरी होणारी बकरी ईद रविवार दिनांक १० जुलै रोजी एकाच दिवशी आल्याने एकमेकांच्या श्रद्धेचा आदर बाळगत चांदोरी व परिसरात शांततेत साजरे केले गेले.

सायखेडा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांचा पिंड हा सामाजिक जाणिवा जागृत ठेवण्याचा असल्यामुळे सायखेडा येथे बदली झाल्यापासून कोणताही गाजावाजा न करता नित्यनियमाने सायखेडा चांदोरी सह पोलीस हद्दीत विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होत उपक्रम राबवत असतात.

चांदोरी येथे एकीकडे बकरी ईद निमित्त सहायक पोलिस निरीक्षक पी वाय कादरी यांनी शुभेच्छा देतांना आषाढी एकादशी निमित्ताने चांदोरी येथील जेष्ठ नागरिकांनी काढलेल्या दिंडी निमित्त सहभागी वारकऱ्यांना फळांचे वाटप करण्यात आले.

एकीकडे जातीय सलोखा सांभाळताना शांतता सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असते,याही काळात योग्य समनव्यातुन सर्व धर्मियांचे सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here