साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
पिण्याच्या पाण्यातून शरीरात क्षारांचे प्रमाण वाढल्याने पोटांचे विकार आणि किडनीच्या विकारांचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढत असल्याचा प्रकार गुरुवारी कवली ता.सोयगाव गावात आढळून आला त्यामुळे गावातील तब्बल १५ ते २० रुग्ण पोटांच्या विकाराने त्रस्त असल्याची माहिती हाती आली आहे.या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली आहे. या किडनीच्या विकारांच्या बाधेने कवली गावात आतापर्यंत २५ रुग्णांचा मृत्यू झालेला असल्याचे खळबळजनक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
कवली ता.सोयगाव येथील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा विहिरीत क्षारांचे मोठे प्रमाण वाढल्याचे उघड झाले असून यामुळे पोटांच्या विकाराचे रुग्ण गावात वाढले असून काहींना किडनीच्या विकाराची बाधा झाल्याचे आढळून आले आहे.
किडनीच्या विकारांच्या रुग्णांवर पाचोरा जि.जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून पोटांच्या विकाराच्या रुग्णांना मात्र शासकीय वैद्यकीय सुविधा मिळत नसल्याने या रुग्णांना सोयगाव,जळगाव येथे खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे.
कवली ग्राम पंचायतीची पाणी पुरवठा विहीर असलेल्या जागेत भूगर्भात क्षारांच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले गेल्या तीन वर्षापासून हि समस्या भेडसावत असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले असून या किडनीच्या विकारांच्या बाधेने कवली गावात आतापर्यंत २५ रुग्णांचा मृत्यू झालेला असल्याचे खळबळजनक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
या समस्येकडे मात्र तालुका प्रशासनाकडून दुर्लक्ष केल्या जात असून आरोग्य यंत्रणेकडून पाठविण्यात आलेल्या पाणी नमुन्यांचा कायम अहवाल दुषित आलेला आहे.तरीही गावाच्या पाणी पुरवठ्यावर पंचायत समितीच्या विभागाकडून लक्ष दिल्या गेले नसल्याने कवली ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे.संबंधित ग्रामसेवक हा नियमित ग्राम पंचायतीवर हजर होत नाही.ग्रामस्थांनी सांगूनही या ग्रामसेवकाकडून कोणत्याही उपाय योजना अद्याप पर्यंत हाती घेण्यात आलेली नसून हा गंभीर जनक प्रकार अद्यापही ग्रामसेवकाने वरिष्ठांच्या कानावर घातलेला नसल्याचे उघड झालेले आहे.
कवली गावाच्या पाणी पुरवठा विहीर असलेल्या भागात क्षारांचे प्रमाण अधिक असल्याचा अहवाल यापूर्वीही भूगर्भ विभागाने पंचायत समितीला दिला असतांनाही संबंधित प्रशासनाने कोणत्याही उपाय योजना हाती घेतल्या नाही त्यामुळे गावातील मृत्यूचे प्रमाण वाढले आहे.
पाणी पुरवठा प्रकरणी कवली गावाच्या महिलांचा पुढाकार
गावात होत असलेल्या क्षारयुक्त पाणी पुरवठ्या बाबत गावातील रणरागिणी पुढे सरसावल्या असून याबाबत महिलांनी बुधवारी पाणी पुरवठा यंत्रणेवर फिल्टर योजना कार्यान्वित करण्याबाबत निवेदन दिलेले आहे मात्र सदरील ग्रामसेवकाने अद्यापही या निवेदनाला पंचायत समितीला सादर केलेले नसल्याचे पंचायत प्रशासनाने सांगितले.
क्षारयुक्त पाण्यामुळे होणाऱ्या विकारांवर वैद्यकीय उपाय होत नसल्याने अनेकांना यामुळे जीव गमवावा लागलेला आहे.सध्या स्थितीत गावात पोटांच्या विकाराचे रुग्ण आढळून येत आहे तर १५ ते २० जणांना किडनीच्या विकाराचा आजार झालेला आहे.त्यामुळे गावात खळबळ उडाली आहे.