मुंबई : प्रतिनिधी
जून महिन्यात घडलेल्या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)आणि देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)यांनी मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्रिपदाची ३० जून रोजी शपथ घेतली. शपथविधी होऊन तीन आठवडे झाले. मात्र, शिंदे सरकार यांचा मंत्रिमंडळ विस्तार ठरला नव्हता. मंत्रिपदावरून शिंदे गट आणि भाजप (BJP) यांच्यात एकजुट नसल्यामुळे राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर पडला होता.
शिंदे गटात सात माजी मंत्री आहेत. त्यांची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये होईल, अशी चर्चा सुरु आहे. शिंदे यांच्या गटात मंत्रिपदाच्या मागणीसाठी बंडखोर आमदारांची नाराजी दिसून आली. राष्ट्रपती निवडणूक होण्यापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार झाला. तर मंत्रिपद न मिळालेल्यांची नाराजी व्यक्त होऊ शकते, याची भीती भाजपला वाटत आहे. “राष्ट्रपतिपदाचे मतदान होऊ द्या. आमदार मुंबईत असतील तेव्हा विस्तार करा. पहिल्या टप्प्यात प्रत्येकी ५ मंत्री शपथ घेतील,” असे केद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी म्हटल्याचे समजते.
राष्ट्रपती निवडणुकीत नाराजी टाळण्यासाठी १९ ते २१ जुलैदरम्यान केवळ १० मंत्र्यांना शपथ देण्यात येणार आहे. शिंदे गटातील पाच तसेच भाजपमधील पाच मंत्री शपथ घेणार आहेत. पावसाळी अधिवेशनाअगोदर १० मंत्र्यांना शपथ देण्यात येणार आहे. अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे समजते.