Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»स्तुत्य उपक्रम : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानी 120 रोपांची लागवड
    जळगाव

    स्तुत्य उपक्रम : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या शासकीय निवासस्थानी 120 रोपांची लागवड

    SaimatBy SaimatJuly 15, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ः प्रतिनिधी

    पोलिस अधीक्षकांचे शासकीय निवासस्थान ‘अभय’ येथे गुरुवारी डॉ. प्रवीण मुंढे यांची कन्या देवयानीचा वाढदिवस वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमात स्थानिक जैवविविधता जपणाऱ्या देशी झाडांच्या 120 रोपांची लागवड करण्यात आली.

    जैन इरिगेशन सिस्टिम लिच्या सहकार्यातून गांधी रिसर्च फाउंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांच्यातर्फे हरित जळगाव ही संकल्पना घेऊन वृक्षारोपणाची चळवळ सुरू करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी निवास परिसरात वृक्ष लागवड करून कन्या देवयानीचा वाढदिवस साजरा करत वृक्षलागवडीच्या चळवळीला प्रोत्साहन दिले. पोलिस अधीक्षक निवास परिसरात लिंब, पिंपळ, करंज, गुलमोहोर, बकुळ, जास्वंद, टिकोमा, पुत्रवंती, कन्हेर अशी 120 च्या वर रोपे लावली. सरासरी तीन वर्षे वयोगटाची ही रोपे होती.
    वृक्षारोपणप्रसंगी पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अमृता मुंढे या दाम्पत्यासह मुलगी देवयानी, मुलगा दिग्विजय, सासरे सेवानिवृत्त आरटीओ आयुक्त लक्ष्मण खाडे, सासू मीराबाई खाडे यांच्यासह गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन, हेमंत बेलसरे, जैन इरिगेशनच्या पर्यावरण विभागातील सहकारी अतिन त्यागी, अनिल जोशी, अजय काळे, मराठी प्रतिष्ठानचे ॲड. जमील देशपांडे, विजयकुमार वाणी उपस्थित होते. वृक्षारोपणासाठी मंगलसिंग राठोड, रविंद्र सपकाळे, बबन गवळी, निलेश मिस्तरी आदींनी सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    Bhusawal : सुनसगावातील कुत्र्यांच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    March 26, 2026

    Kerosene Distribution : गॅसटंचाईवर उपाय! राज्य सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी रॉकेल वाटप सुरू

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.