शहराच्या रस्ते विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर आ. राजुमामा भोळे यांच्या प्रयत्नांना यश

0
34

जळगाव : प्रतिनिधी 

शहरातील डांबरी रस्त्यांची होणारी दुर्दशा पाहता आमदार राजुमामा भोळे यांच्या मागणीप्रमाणे रिंगरोड व गणेश कॉलनी परिसरातील पाच रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी पाच कोटींचा निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, सदर निधी बाबत  आ.राजुमामा भोळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

आ.राजुमामा भोळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे शहरातील रस्ता काँक्रिटीकरणासाठी नगरविकास विभागातर्फे पाच कोटींच्या निधीची मागणी केली होती. त्यानुसार नगरविकास विभागाने शहरातील रिंगरोड, गणेश कॉलनी, एसएमआयटी आणि अयोध्यानगर भागातील रस्त्यांच्या कामांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे आ.राजुमामा भोळे यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री आ.गिरीश महाजन यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here