सत्ता गेली तरी पद सोडणार नाही… रूपाली चाकणकरांना पदाचा मोह काही सुटेना

0
17

साईमत लाईव्ह नाशिक प्रतिनिधी :

जवळपास २० दिवसांच्या सत्ता संघर्षानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadnavis) सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने विविध मंडळांवर आणि आयोगामध्ये नेत्यांच्या केलेल्या नियुक्त्या कधीही रद्द होण्याची शक्यता आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi government) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षस्थानी नियुक्त केलेल्या रूपाली चाकणकरांना पदाचा मोह आद्यपही कायम आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक पद आहे. हे पद स्वीकारण्यापूर्वी आपण राष्ट्रवादी पक्षातील पद सोडले आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन नवीन सरकार स्थापन झाले असले तरी आयोगाचे अध्यक्षपद सोडण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी म्हटले आहे.

 

नाशिक शहर-जिल्ह्यातील महिला सुरक्षिततेसंदर्भातील आढावा घेण्यासाठी नाशिक दौऱ्यावर आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर मंगळवारी आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय सत्तांतरावर आपले मत व्यक्त केले. चाकणकर म्हणाल्या, राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद हे घटनात्मक आहे. त्यामुळे या पदावर येण्यापूर्वी आपण राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात काम करीत होते. मात्र स्वीकारण्यापूर्वी आपण राष्ट्रवादीतील पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आयोगाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. त्यामुळे राज्यभरातील महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात, त्यांच्यावरील अत्याचाराला वाचा फोडून न्याय देण्यासंदर्भात आयोगाकडून काम केले जाईल. राज्यातील बदलत्या सत्ताकारणामुळे पद सोडण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही, असे ठाम मत आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here