सोयगाव : विजय चौधरी
कवळी येथील दूषित पाण्याबाबत निवेदन देण्यासाठी मंगळवारी ग्रामपंचायत मध्ये गेलेल्या महिलांना ग्रामसेवक पी एस ढोले हे गैरहजर दिसल्याने त्यांनी ग्रामपंचायतीला कुलूप लावले. कवली गावात दूषित पाण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत याबाबत निवेदन देण्यासाठी महिला ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या होत्या मात्र ग्रामसेवक गैरहजर होते त्यांनी महिलांसोबत मोबाईल वरून संपर्क साधला मात्र समाधानकारक उत्तर न दिल्याने महिला संतप्त झाल्या त्यांनी ग्रामपंचायतिला कुलूप लावले.
ग्रामपंचायतीला कुलूप लावून देखील पंचायत समितीच्या एकाही अधिकाऱ्याने गावाला भेट दिली नाही व महिलांच्या समस्या जाणून घेतल्या नाहीत. ग्रामसेवक पी एस ढोले यांच्या सततच्या कामचुकारपणाविषयी वेळोवेळी पंचायत समितीला निवेदन देऊन सुद्धा त्यांच्यावर कुठलीच कार्यवाही होत नसल्याने देखील कवली ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे, आशा निगरगष्ठ ग्रामसेवकामुळेच आमचे गाव विकासापासून वंचीत असून या कामचुकार अधिकाऱ्यास पंचायत समिती सोयगाव का पाठीशी घालत आहे आहे असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय.
ग्रामपंचतीला कुलूप लावते वेळी कविता केंडे,अलामनूर तडवी,छायाबाई तराळ, अनिताबाई धोबी, सुनीता तराळ, संगीताबाई केंडे,आशाबाई वानखेडे, बेबाबाई पाटील,भतीजान तडवी,लताबाई पवार,अशाबाई पवार,धोंडाबाई म्हस्के यांच्या सह इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थिती होती.