जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अंधाधुंद कारभाराबाबत सीईआेंची भूमिका संशयास्पद

0
29

साईमत लाईव्ह जळगाव  विशेष प्रतिनिधी

जळगाव जिल्हा  परिषदेमधील बांधकाम विभागातील कामे वाटपाच्या दहा टक्केवारीचा विषय यासह सुशिक्षित बेरोजगारांची कामे वाटपाच्या यादीतील घोळ व पाटील नामक कर्मचाऱ्यांची चक्क कागदपत्रे व फाईली घरी नेेऊन मनमानी केल्याप्रकरणी प्रसिद्धी माध्यमांनी आवाज उठविला आहे.तरीसुद्धा कार्यकारी अभियंता श्री. ढिवरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी ‘तोंंडावर बोट हाताची घडी’ अशी भूमिका घेत कागदी घोडे नाचवित आम्ही कार्यवाही करीत आहोत असा कांगावा सुरु ठेवला आहे.  याबाबत मात्र जि.प.चे सीईओ पंंकज आशिया यांची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.

जि.प.च्या बांधकाम विभागातील लेख सहायक पी.एम पाटील यांनी सरकारी कागदपत्रे व फाईली घरी घेऊन जाऊन आपल्या मनमानीप्रमाणे कामे वाटप केली असल्याचे उघड झाले आहे.श्री. पाटील यांना कार्यकारी अभियंता बांधकाम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे खुले पाठबळ असल्याने कामे वाटपात घोळ करीत दहा टक्केप्रमाणे वसुलीचा अजब फंडा यांनी अवलंबला होता. कार्यकारी अभियंता बांधकाम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांचीच मिलीभगत असल्याने श्री.पाटील हे निर्धास्त होते मात्र या प्रकरणी सुशिक्षित बेरोजगार तरुणांंनी आवाज उठवल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.

श्री. पाटील यांच्यावर कार्यवाही करणे अपेक्षित असतांनाही त्यांना अभय दिले जात आहे. श्री. पाटील यांच्यासह कार्यकारी अभियंता बांधकाम श्री. ढिवरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेही दोषी असल्याची चर्चा  जि.प.मध्ये सुरु आहे. या प्रकरणी मात्र जि.प.चे सीईओ पंकज आशिया यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here