Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»मुंबई»शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल ; ‘या’ बंडखोर आमदाराचा दावा
    मुंबई

    शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल ; ‘या’ बंडखोर आमदाराचा दावा

    SaimatBy SaimatJuly 8, 2022Updated:July 8, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नांदगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी

    शिवसेनेशी (Shiv Sena) बंडखोरी करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटात सामील झालेले आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल, असा दावा केला आहे. कांदे हे काल आपल्या निवास्थानी नांदगावला (Nandgaon)दाखल झाले. यावेळी कांदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. सत्ताबदल हे निमित्त असले व त्यात सुख असले तरी त्यात एक दर्द आहे, अशी भावना कांदे यांनीं व्यक्त केली.

    एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड व्हावी, यासाठी आमदार कांदे यांनी शिर्डीच्या साईबाबा (shirdi Saibaba)चरणी साकडे घातले होते. हा नवस फेडण्यासाठी शिर्डीला गेलेले आमदार कांदे बुधवारी रात्री त्यांच्या हनुमान नगरातील निवासस्थानी पोहोचले.

    राज्यात शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात सत्ता स्थापन झाली तरी विकासाची जबाबदारी पार पाडायची आहे. मतदारसंघाच्या विकासाकडे आपल्याला भर देण्याची गरज आहे. पुरातून उद्‌ध्वस्त झालेल्या नांदगावच्या वस्तीसाठी संरक्षक योजना असो की ७८ खेड्यांची नांदगाव शहराची पाणीपुरवठा योजना असो. मतदारसंघातील विकासकामांसाठी मिळणाऱ्या निधीत अनेकांनी अडथळे आणले. यासंदर्भात अनेकदा आम्ही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना तक्रारही केली. महाविकास आघाडीत शिवसेनेच्या आमदारांचा जीव विकास निधीसाठी घुसमटत होता. मातोश्रीशी असलेली नाळ तुटू नये, यासाठी आपण सर्व पातळीवर प्रयत्न केले.

    पुढच्या कायदेशीर लढाईत धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला नक्कीच मिळेल, असा आत्मविश्‍वास आमदार कांदे यांनी व्यक्त केला. मतदारसंघात हाताच्या बोटावर असलेली शिवसैनिकांची नाराजी ही ‘विशिष्ट’ महत्वाकांक्षेतून आली आहे. मात्र त्यांचे गैरसमज दूर कारण्यात आम्ही नक्कीच यशस्वी होणार,असे कांदे म्हणाले . तसेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही सडकून टीका केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Stock Market Holiday : सुट्ट्यांचा शेअर बाजारावर परिणाम; पुढील आठवड्यात NSE-BSE चार दिवस बंद

    March 28, 2026

    Devendra Fadnavis : लॉकडाऊनची अफवा पसरवणाऱ्यांनो खबरदार; मुख्यमंत्री फडणवीसांनी दिला कारवाईचा इशारा

    March 27, 2026

    Titwala Crime News : अल्पवयीन मुलींशी गैरवर्तनप्रकरणी क्रिकेट कोच अटकेत

    March 27, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.