मुंबई : साईमत लाईव्ह प्रतिनिधी
राज्यात शिंदे-फडणवीसचे सरकार ( Shinde-Fadnavis Govt) स्थापन झाले आहेत. या सरकारकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेतल्या जातील, असा विश्वास प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu)यांनी व्यक्त केला आहे.
शिंदे गट(Shinde Govt) आणि भाजपचे सरकार सहा महिन्यातच कोसळणार असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी केले. मात्र सरकार कोसळणार असे सांगणे हे विरोधकाचं कामच असतं. त्याकडे जास्त लक्ष देण्याची गरज नाही, असा टोला बच्चू कडू यांनी लगावला. तसेच शिंदे-फडणवीस यांची जोडी फेविकॉलपेक्षा मजबूत असल्याचेही ते म्हणाले.
तसेच कडू यांनी मंत्रिपदाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आपले मत व्यक्त केले. मंत्रीपदापेक्षा मतदार संघातील विकास महत्त्वाचा असतो. तसेच माझ्यासाठी दिव्यांगांचा विषय महत्त्वाचा आहे,असे ते म्हणाले.
दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पाठिंबा दिला असल्याचा खुलासा बच्चू कडू यांनी यावेळी केला. राष्ट्रवादीकडून मतदार संघात निधी मिळत नव्हता. शेवटी जनतेची काम करत असताना तुम्ही मंत्री असला तरी तुमचा मतदारसंघ तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो,अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे.