कागद पत्रे गहाळ प्रकरण : पी.एम.पाटील नामक कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याच्या आक्रमक मागणीने धास्तावले अधिकारी

0
30

जळगाव : साईमत लाईव्ह प्रतिनिधी 

जळगाव जिल्हा परिषदेच्या ह्या नव्या वादाचा नवा चेहरा पी एम पाटील नामक कर्मचाऱ्याच्या कागद पत्रे व फाईल आपल्या मन मर्जी प्रमाणे घरी घेऊन जाऊन कामे करण्याच्या अजब गजब प्रकाराने समोर आले आहे. ह्याला बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.धिवरे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी श्री.मोहन ह्यांचे खुले पाठबळ असल्यानेच श्री पाटील ह्यांनी हि हिम्मत दाखवली असल्याचे उघड गुपित असलेली चर्चा जी.प सह जिल्हाभर गाजत आहे. ह्यात खरे तर राजा बोले दल हाले अशी परिस्थिती असतांनाही कर्मचार्यावरच गुन्हे दाखल होण्याची वेळ येऊन ठेपली आहे. या मुळे छत नसलेले कर्मचारी खूप धास्तावले आहेत.

जळगाव जी.प त आता नवीन वादाची सुरुवात झाली आहे. ज्याच्या हाती ससा तो पाळधी … अशी एकंदरीत परिस्थिती जी.प त पाहावयास मिळत आहे. प्रशासक नेमणुक झाल्या पासून जी.प सदस्य उपाध्यक्ष व अध्यक्ष ह्यांचा वावर जी.प त नसल्याने अधिकाऱ्यांना मन मर्जी कारभारासाठी फावले असल्याचा प्रकार अधिकाऱ्यांच्याच अंगलट येणार असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. १८/४ २०२२ च्या कामे वाटपाच्या बैठकीत नियम बाह्य कामे वाटप केल्याने ज्यांना कामे मिळाली नाहीत त्यांनी बंड पुकारल्याने कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यांच्या अडचणीत जास्तीच्या वाढी झाल्या आहेत. त्यांच्या महत्वाच्या प्यादा असलेला पी एम पाटील नामक कर्मचाऱ्यावर कागद पत्रे व फाईली घरी घेऊन जाऊन मन मर्जी प्रमाणे कामे वाटप करणे प्रकरणी श्री पाटील वर गुन्हे दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. ह्या मुळे १८/४/२०२२ झालेली मिटिंग व त्या मिटिंग मध्ये मंजूर झालेली कामे ” ह्या सह कामांच्या झालेल्या कार्यात आदेश रद्द कारण्यासंबंधीही काहींनी तक्रारी केल्या आहेत. एकंदरीत ह्या संपूर्ण प्रकरणा कडे जिल्हा वासियांचे लक्ष लागून आहे.

“सी ई ओ न च्या भूमिके कडे लक्ष…
ह्या संपूर्ण गैर प्रकाराचा दांगडो सी ई ओ ह्यांच्या दालनाच्या बाहेरच झाला आहे. सी ई ओ श्री. पंकज आशिया ह्या गंभीर प्रकरणी काय कार्यवाही करतात ह्या कडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here