फडणवीसांकडे गृह खाते!, मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला

0
30

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :

एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. या शपधविधीनंतर पहिल्याच बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने दोन मोठे निर्णय घेतले. पहिला म्हणजे मुंबईतील आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बवण्याचा आणि दुसरा म्हणजे जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा. हे निर्णय होताच आज पुन्हा मोठ्या घडामोडी सुरू आहेत. यातच मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर आता वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कोण असेल आणि कोणाला कुठली खातील मिळतील हे अद्याप निश्चित झालेलं नाही. पण मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागू शकते याच्या चर्चा मात्र रंगू लागल्या आहेत. बंडखोर शिवसेना आमदार आणि माजी मंत्र्यांची पुन्हा वर्णी लागू शकते असं बोललं जातंय. तर खात्यांबाबतही चर्चांना उधाण आलं आहे.

एकनाथ शिंदे गटाला १५ मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपकडे महत्त्वाची खाती असतील असं बोललं जातंय. भाजपकडे गृह, अर्थ, कृषी, महसूल, सार्वजनिक बांधकाम, शालेय शिक्षण आणि पर्यावरण खात्यासह इतही खातील असतील, असं बोललं जातंय.

शिवसेना-भाजप युती सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदासह देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गृह खातंही होतं. यामुळे आताच्या नव्या शिंदे-फडणवीस सरकारमध्येही फडणवीसांकडेच गृह खातं असेल, अशी शक्यता आहे. त्यावेळी शिवसेनेला फक्त १२ खाती दिली गेली होती. पण आता एकनाथ शिंदेंकडे दावेदारीसाठी मोठी ताकद आहे. यामुळे नगरविकास खात्यासह इतर महत्त्वाची खाती शिंदे गटाकडे असतील, अशी चर्चा आहे.
मुंबईचे नवे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही भेट म्हणजे फडणवीस यांच्याकडे गृह खातं असल्याचे संकेत असल्याचं बोललं जात आहे. भाजपमधून फडणवीसांसह मंत्रिपदासाठी चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, संजय कुटे यांच्यासह काही आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here