उतायचे नाही, मातायचे नाही,अडीच वर्षांनंतर स्थापन होणारे सरकार २५ वर्षे टिकेल; फडणवीसांचा गौप्यस्फोट

0
26

मुंबई : शिवसेनेत(Shivsena) झालेल्या भूकंपानंतर मागील ८-१० दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. काल अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याबरोबरच अडीच वर्षांपासून सत्तेवर असलेले महाविकास आघाडी सरकार कोसळले. ठाकरे सरकार पडल्यानंतर आता भाजपाने सरकार स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. या घडामोडींदरम्यान, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. उतायचे नाही, मातायचे नाही, जनतेची काम करायचे. अडीच वर्षांनंतर स्थापन होणारे सरकार २५ वर्षे टिकेल. एक स्थिर सरकार महाराष्ट्राला देऊ, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

काल दिवसभरात घडलेल्या अनेक घडामोडी आणि कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर रात्री सुप्रीम कोर्टाने बहुमत चाचणी ठरलेल्या दिवशीच घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करत उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पराभव झाला म्हणून आपण उन्माद करायचा नाही, असा सल्ला भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिला. ते म्हणाले की, अडीच वर्षांनंतर स्थापन होणारे सरकार २५ वर्षे टिकणारे असेल. या संपूर्ण लढाईत भाजपाच्या आमदारांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. तसेच या संपूर्ण घटनाक्रमात निर्णायक भूमिका घेणाऱ्या शिंदे गटातील आमदारांचेही मी आभार मानतो.

आता शपथ घेऊ आणि नंतर जल्लोष करू. येणाऱ्या काळात आपण महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देऊ. आता उतायचे नाही, मातायचे नाही, जनतेची कामे करत राहायचे. नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्यासाठी सध्या कळ सोसा, असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिला. तसेच आपण सगळ्यांनी टिम म्हणून काम केल्याबद्दल धन्यवाद, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here