यावल : प्रतिनिधी
जळगाव पाटबंधारे कार्यक्षेत्रातील हतनुर धरण यावल उपविभागीय कार्यालयातील कर्तव्यदक्ष उपविभागीय अभियंता एन.पी.महाजन हे आपल्या 38 वर्षाच्या यशस्वी प्रदीर्घ सेवेनंतर दि.30 जून2022 रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
एन.पी.महाजन प्रथम 1984 मध्ये नाशिक येथील पाटबंधारे प्रकल्प अन्वेषण विभाग सेवेत रुजू झाले.त्यानंतर 1987मध्ये जळगाव जिल्ह्यात मध्यम प्रकल्प विभागात हिवरा प्रकल्पात,त्यानंतर चोपडा तालुक्यात धानोरा हतनुर कालवा कार्यालयात,बुलढाणा जिल्ह्यात चिखली लघु पाटबंधारे विभागात, देऊळगाव राजा(जिल्हा बुलढाणा)खडकपूर्णा प्रकल्प विभागात,1997 मध्ये पुन्हा जळगाव जिल्ह्यात जळगाव पाटबंधारे विभागात ,त्यानंतर एरंडोल तालुक्यात गिरणा पाटबंधारे विभाग,जळगाव पाटबंधारे कार्यक्षेत्रात हतनूर प्रकल्प विभागात नंतर सर्वात शेवटच्या टप्प्यात हतनुर प्रकल्पाअंतर्गत यावल उपविभागीय कार्यालयात उपविभागीय अभियंता म्हणून त्यांनी यशस्वीपणे कर्तव्यदक्षतेने आपली 38 वर्ष यशस्वीपणे शासकीय सेवा केली.अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यास दि. 30जून2022 रोजी सेवानिवृत्ती निमित्त उपविभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांतर्फे आदरपूर्वक निरोप देण्यात येणार आहे.