मुंबई : प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आपल्या बंडखोर आमदारांसह उद्या मुंबईत दाखल होणार आहे. मी आपल्या सहकारी आमदारांसह बहुमत चाचणीसाठी ते मुंबईत येणार असल्याची माहिती स्वतः शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विधाभवन सचिवालय आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्यासाठीचे आदेश देणारं पत्र पाठवले. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणीला समोर जावे लागणार आहे. कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला ३० जूना बहुमत चाचणी सिद्ध करण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलण्याचे आदेश दिले आहेत. तसेच कोणत्याही कारणास्तव अधिवेशन तहकुब करता येणार नाही. उद्या सकाळी ११ पासून तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण होईल.
दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. यनंतर राज्यपालांनी तातडीने पाऊले उचलत ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देणारे पत्र पाठवले आहे.