Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»चाळीसगाव»चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती व वकील संघातर्फे जागतिक अमली पदार्थ  विरोधी दिवस ‘ विषयावर ऑनलाईन शिबीर
    चाळीसगाव

    चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती व वकील संघातर्फे जागतिक अमली पदार्थ  विरोधी दिवस ‘ विषयावर ऑनलाईन शिबीर

    SaimatBy SaimatJune 28, 2022Updated:June 28, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह चाळीसगाव प्रतिनीधी

    येथील चाळीसगाव तालुका विधी सेवा समिती व वकील संघ यांचे संयुक्त विद्यमाने जागतिक अमली पदार्थ  विरोधी दिवस ‘ या विषयावर ऑनलाईन शिबीर घेण्यात आले.

    महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण , मुंबई व  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या निर्देशनाप्रमाणे जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस या विषयावर तालुका विधी सेवा समिती , चाळीसगाव आणि वकील संघ चाळीसगाव तसेच व्हीजन क्लासेसचे संचालक प्रा.धनंजय पाटील यांचे संयुक्त विद्यमाने ऑनलाईन शिबीर घेण्यात आले.

    शिबीराची प्रस्तावना व सूत्रसंचालन तालुका वकील संघाच्या सचिव अॅड. माधुरी बी . एडके यांनी केली. यावेळी ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंग केले यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस युनाटेड नेशनचा अध्यादेश ४७ / ११२ दिनांक ०७ डिसेंबर १ ९ ४७ नुसार दरवर्षी २६ जून रोजी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येतो. प्रामुख्याने हा दिवस साजरा करण्याचा हेतु हा विविध स्तरातून अमली पदार्थ विरोधी जनजागृती व्हावी हा उद्देश आहे . पुढील पिढीला अमली पदार्थापासून वाचविणेसाठी कुटूंब संस्था , शिक्षण संस्था , वैद्यकीय संस्था , शालेय अभ्यासक्रमातून अमली पदार्थाच्या शरिरावर होणा – या दुष्परिणामाबाबत जागृती होणे आवश्यक आहे . त्याचप्रमाणे समाजस्वास्थाच्या अनुषंगाने अमली पदार्थ मद्य उत्पादनावर बंदी आणावी ही अपेक्षा व्यक्त केली . तसेच अमली पदार्थांची विक्री ही दिव्यांग व कमकुवत व्यक्तींना हाताशी घेवून केली जाते याबाबत खेद व्यक्त केला.

    तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश व स्तर एन. के. वाळके यांनी अध्यक्षीय भाषणात विषयास अनुसरुन कायदेशीर माहिती दिली व उपस्थितांशी संवाद साधला.

    कार्यक्रमास अॅड . वर्षा देवरे , खजिनदार तालुका वकील संघ चाळीसगाव , अॅड . कविता जाधव , अॅड . योगिता निकुंभ , अॅड . भुषण एडके , अॅड .  राहुल वाकलकर , सदस्य तालुका वकील संघ चाळीसगाव , चाळीसगाव तालुका वकील संघातील सदस्य , व्हीजन क्लासेसचे विद्यार्थी व न्यायालयीन कर्मचारी डी.के. पवार , व. लिपीक , डी . टी . कु – हाडे उपस्थित होते . कार्यक्रमाचे आभार तालुका वकील संघाचे  अध्यक्ष अॅड .  भागवत के . पाटील यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Chalisgaon : औट्रम घाटाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

    December 19, 2025

    Chalisgaon : वॉर्ड क्रमांक १६ बाराभाई मोहल्ल्यात पथदिवे बंद तर गटारी तुंबल्या

    December 18, 2025

    Chalisgaon : चाळीसगाव तालुक्यात अवैध मुरूम उत्खनन सर्रासपणे सुरू

    December 12, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.