साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी
एकनाथ शिंदे यांच्या बंडाने महाराष्ट्रात राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करोनाची लागण झाल्याचं वृत्त येत आहे. करोनाची लागण झालेली असली तरी प्रकृती अतिशय ठणठणीत आहे. अजित पवार डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. तशी माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे.
काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 27, 2022
“कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन”