मुंबई :
सध्या राज्यात शिवसेनेतील बंडखोरी हा विषय चर्चेत आहे. एका कार्यक्रमात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी याना याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणालेत की “महाराष्ट्र सरकारवरील संकट लवकरच दूर होईल,असे मला वाटते.” हे संकट आपण दूर कराल का, याच्या उत्तरात ते म्हणालेत की “आगे-आगे देखो होता है क्या! आजच्या समस्येत उद्याची उत्तरं लपलेली असतात. लवकरच सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळतील. आलेले ढग दूर होतील. अंधकार नष्ट होईल आणि सूर्य उगवेल.”
गडकरी आणि उद्धव ठाकरे यांचे व्यक्तिगत संबंध अतिशय घनिष्ट आहेत त्यामुळे ठाकरेंवर घोंगावणारे ढग दूर होतील का? असा प्रश्न त्यांना विचरण्यात आला. गडकरी म्हणालेत, वेयक्तीक संबंध, हे राजकीय संबंधांपेक्षा वेगळे असतात. मग ते सरकारमध्ये असोत अथवा नसोत. संबंध तसेच असतात.
महाराष्ट्र सरकारवर आलेल्या संकटामागे भाजप आहे? या प्रश्नावर गडकरीत म्हणाले “मी महाराष्ट्रातील राजकारणावर अधिक भाष्य करणार नाही. मात्र, एवढे नक्की सांगेन की शिवसेना आणि भाजप पुन्हा एकत्र आले तर माझ्यासारख्या व्यक्तीला नक्कीच आनंद होईल.”