जामनेर प्रतिनिधी
जामनेर तालुक्यातील गोद्री येथे मध्यरात्री घरात दरोडा टाकून वृद्ध महिलेचा गळा दाबून खून करून तिच्या अंगावरील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जामनेर तालुक्यातील गोद्री येथील मानबा बाई सरदार तडवी वय 85 घ्या 21 जून रोजी सायंकाळी जेवण करून आपल्या घरात झोपल्या असताना मध्यरात्रीच्या सुमारास संशयित आरोपी बब्बु सांडू तडवी राहणार भारुडखेडा तालुका जामनेर वय 27 यांनी वृध्द महिलेचा गळा दाबून खून केला आहे अंगावरील सोन्याच्या बाळ्या व चांदीच्या पाटल्या असा एकूण बत्तीस हजार सहाशे रुपयांचा किमतीचा मुद्देमाल बळजबरीने काढून चोरून नेला आहे.
याप्रकरणी पहुर पोलीस ठाण्यात शेनफडाबाई तडवी यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी बब्बु सांडू तडवी विरोधात गुन्हा दाखल करून याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे हे करीत आहे.
