साईमत लाईव्ह पुणे प्रतिनिधी : शिवसेनचे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. याचे पडसाद देश – विदेशातही उमटत आहेत. नेटीजन्स याबाबत सर्च करत आहेत. जगातील ३३ देशात एकनाथ शिंदे टॉपवर(Google search) आहेत तर देशात ठाकरे, फडणवीस, पवारांनापेक्षाही जास्त नेटीजन्स शिंदेच्या माहितीसाठी सर्च करत आहेत.शिवसेना आता काय करणार, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)हे आव्हान कसे पेलणार याची उत्सुकता लोकांना आहे. हा सामना कोण जिंकणार, याची चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरु आहे.
शिंदेबाबत देशातच नव्हे तर पाकिस्तान, सौदी या देशांमध्येही उत्सुकता आहे. तीन दिवसापासून गुगुलवर (Google Trend) ‘एकनाथ शिंदे’ सर्च केले जात आहे. एकनाथ शिंदेंविषयी अधिक माहिती नसल्याने गुगलवर त्यांच्याविषयी माहिती, व्हिडिओ, बातम्या अनेक जण सर्च करीत आहेत.
देशभरात शिंदेंचा तीन दिवसांतील सर्च ट्रेंड ६४ टक्के आहे. ही संख्या १० लाखांपेक्षा अधिक आहे. पाकिस्तान, सौदी या देशांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी शिंदेंविषयी माहिती ‘सर्च’ केली आहे.
एकनाथ,शिंदे, उद्धव ठाकरे, शिवसेना या घडामोडी महाराष्ट्राशी संबंधित असल्याने उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्या तुलनेत देशात शिंदेंचा ‘सर्च ट्रेंड’ ६४ टक्के आहे. २१ जून रोजी दुपारी २.३० वाजता शिंदेंचा ट्रेंड टाॅपवर होता. २२ जून राेजी ते सुरतहून गुवाहाटीला गेल्यानंतर हा ट्रेंड आणखी वाढला. २२ जून राेजी दुपारी १२.३० वाजेपासून उद्धव ठाकरेंचा ट्रेंड सुरू होता. बुधवारी पत्रकार परिषदेनंतर रात्री १०.३० वाजता ठाकरे ‘सर्च ट्रेंड’मध्ये एकनाथ शिंदेंच्या पुढे होते. देशांमध्ये ३ दिवसात पाच नेत्यांविषयी माहिती सर्च करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे सर्वात पुढे होते.
एकनाथ शिंदेंविषयी विदेशात ‘सर्च ट्रेंड’ – पाकिस्तान- ५४ टक्के, सौदी अरेबिया- ५७ टक्के, मलेशिया- ६१ टक्के, नेपाळ- ५१ टक्के, बांगलादेश- ४२ टक्के, थायलंड- ५४ टक्के, जपान- ५९ टक्के, कॅनडा- ५५ टक्के