एकनाथ शिंदेंचे ४२ आमदारांसह आपले शक्तिप्रदर्शन; बाळासाहेब, दिघे, शिवसेनेचा आवाज घुमला

0
8

साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :-

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे  यांच्यागटात किती आमदार सहभागी आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता शिंदे यांनीच गुवाहाटीतील हॉटेलमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली ताकद दाखवून दिली. या शक्तीप्रदर्शनाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहे. यामध्ये एकूण ४२ आमदार दिसत असून त्यामध्ये ३५ आमदार शिवसेनेचे आहेत.

गुवाहाटीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिंदेंसह सर्व बंडखोर आमदार थांबले आहेत. आज दुपारी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व आमदारांचे फोटोसेशन झाले. तसेच याचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. हे सर्व आमदार शिवसेनेचा जयजयकार करत असल्याचे दिसतात. तसेच बाळासाहेब ठाकरे , आनंद दिघे  आणि एकनाथ शिंदे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं, अशा घोषणा देत आहेत.

यात सात अपक्ष आमदार असून उर्वरित ३५ शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे शिंदे यांना पक्षावर किंवा गटनेते पदावर दावा सांगण्यासाठी, सर्व आमदारांचं पद वाचवण्यासाठी आणखी दोन आमदारांची गरज भासणार आहे. मात्र अजून काही आमदारांना घेऊन एक विमान गुवाहाटीत पोहचणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

दरम्यान, या शिवसेना आमदारांच्या बंडामुळे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. ठाकरे यांच्याकडे १८ आमदार असल्याचे सांगितले जात आहे. दोन आमदार त्यांच्या संपर्कात नसल्याचे सांगितले जात आहे. सध्या मुंबईत असलेल्या आमदारांमध्ये दोन कॅबिनेट मंत्र्यांचा समावेश आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडील आमदारांची संख्या कमी कमी होताना दिसत त्यांच्याकडे आता आदित्य ठाकरे  आणि उदय सामंत हे दोनच मंत्री आहेत. सुनील प्रभू, अजय चौधरी, भास्कर जाधव, नितीन देशमुख, कैलास पाटील, रविंद्र वायकर, सुनिल राऊत, वैभव नाईक, प्रकाश फातर्पेकर, संजय पोतनीस, सुजित मिंचेकर, राजन साळवी व रमेश कोरगांवकर, संजय बांगर या आमदारांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here