साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगावसह परिसरात बुधवारी दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने सोयगाव आणि जरंडी मंडळात जोरदार मुसंडी मारली आहे तर रावेरी शिवारात शेतात काम करणाऱ्या युवा शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने या घटनेत युवा शेतकरी गंभीररित्या भाजला असून दुसऱ्या अन्य घटनेत कंकराळा शिवारात वीज कोसळून झाडाखाली बांधलेल्या गायीचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे सोयगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सोयगाव परिसरात बुधवारी जोरदार विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली यामध्ये रावेरी शिवारात गट क्रमांक-एक मध्ये शेतात काम करणाऱ्या संजय राजाराम मोरे(वय २४ रा.जरंडी) याच्या अंगावर वीज कोसळल्याने तो गंभीररित्या भाजला असून त्याच्या डोक्यावरील केस यामध्ये जळलेल्या अवस्थेत असून त्याच्या हाताला जोरदार गंभीररीत्या दुखापत झाल्याची घटना उघडकीस आली आहे वीज अंगावर कोसळताच संजय मोरे यांच्या अंगावर वीज कोसळताच बाजूलाच असलेल्या कैलास मोरे,दिनेश मुठ्ठे यांनी धाव घेवून त्यास तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.दुसऱ्या एका घटनेत कंकराळा शिवारात गट क्रमांक-९३ मधील शेतात महादू प्रताप परदेशी यांची गाय बांधलेल्या लिंबाच्या झाडावर अचानक वीज कोसळून या झाडाखाली बांधलेल्या आठ वर्षीय गायीचा जागीच ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच तहसीलदार रंमेश जसवंत,लिपिक शरद पाटील,शिपाई अनिल पवार आदींच्या पथकाने घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला आहे.रात्री उशिरा पशुसंवर्धन विभागाने मृत गायीचे शवविच्छेदन करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्यात आला आहे.दरम्यान अचानक या दोन्ही घटनांमुळे जरंडी,कंकराळा,माळेगाव,पिंप्री आदी भागात घबराट पसरली आहे.
चौकट सोयगाव आणि जरंडी या दोन्ही मंडळात झालेल्या धुव्वाधार पावसामुळे लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिके पाण्यात बुडाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तीन दिवसाच्या खंडनंतर अचानक जोरदार पावसाने मुसंडी घेतली असून या जोरदार पावसात जरंडी परिसरातील २६० हेक्टरवरील कपाशी पिके पाण्यात बुडाली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.महसूल व कृषी विभागाच्या संयुक्त पाहणीनंतर हा आकडा हाती येईल असा अंदाज तालुका प्रशासनाने वर्तविला आहे.
नुकसानीच्या पाहणी साठी तालुका कृषी विभागाची अद्यापही भेट दिलेली नसून तहसीलदार रमेश जसवंत यांनी पावसाने उघडीप देताच नुकसानीची पाहणी केली आहे.
सोयगावला पावसाने दमदार हजेरी लावली परंतु या पावसाचा जोर कंकराळा,माळेगाव,पिंप्री,रावेरी आदी भागात अधिक होता त्यामुळे या भागात नदी,नाले दुथडी भरून वाहतांना आढळून आली आहे.
शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान
जरंडी सह कंकराळा,माळेगाव,पिंप्री,रावेरी आदी भागात शेतात पाणी साचल्याने शेकडो एकरशेती पाण्याखाली आली होती त्यामुळे कपाशीच्या कोवळ्या अंकुरांना वाढीच्या काळातच जलसमाधी मिळाली आहे.
कोट१)सोयगाव परिसरातील कंकराळा शिवारात शेतातील झाडावर वीज कोसळल्या प्रकरणी तातडीने पंचनामा करण्यात आला आहे.संबंधित विभागाला शवविच्छेदन करून अहवाल तहसील कार्यालयाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.