मुंबई : राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांसोबत बंड पुकारला आहे. शिवसेनेने या बंडाच्या विरोधात कठोर पाऊले उचलत बंडखोर आमदारांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. शिवसेना विधीमंडळ पक्ष मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्हिप जारी केला आहे. त्यामुळे बंड पुकारलेले आमदर वर्षा बंगल्यावर संध्याकाळपर्यंत पोहोचणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी आमदारांना सूचना जारी करण्यात आल्या आहे . सध्या सुरु असलेल्या घडामोडी पाहता शिवसेनेकडून हा व्हिप जारी करण्यात आला आहे.पक्षांतर घडवून सरकार पडण्याचा प्रयत्न होत असल्याने आणि त्यामुळे राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी आज संध्याकाळी ५ वाजता शिवसेनेकडून तातडीची बैठक घेण्यात येत आहे.
या बैठकीला उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदसत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे, असे मानले जाईल आणि परिमाणी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रेसंदर्भात असलेल्या तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशारा शिवसेनेने पत्राच्या माध्यमातून आमदारांना दिला आहे.
