मुंबई प्रतिनिधी यास्मिन शेख
शिवसेनेतील बंड नवीन नसले तरी शिवसेनेतील बंडाने आघाडी सरकार ला अडचणीत आले आहे. सरकार अल्पमतात आले आहे . त्यामुळे आज काय काय घडते या कडे लक्ष लागले आहे . यातच आदित्य ठाकरे यांनी आपल्या प्रोफाइल वरून मंत्री पद हटवले आहे तर आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जातंय .
शिवसेनेच्या गटनेतेपदावरून हटवल्यानंतर बंडखोर आमदारांबरोबर असलेले एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आणि याच सगळ्या वादळाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी त्यांच्या प्रोफाइवरून मंत्रिपदाचा उल्लेख काढला आहे.
दरम्यान, सुरतमध्ये मुक्काम ठोकल्यानंतर एकनाथ शिंदे भल्या पहाटेच 33 आमदारांना घेऊन गुवाहाटीला तळ ठोकून आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आणखी आमदार येणार असा दावा केला होता. त्यांचा हा दावा आता खरा ठरला आहे.
गुवाहाटी विमानतळावर आणखी एक सेनेचा आमदार एकनाथ शिंदेंचा तंबूत पोहोचला आहे. आमदार योगेश रामदास कदम हे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहे. गुहाहटी विमानतळावर भाजपा आणि सेनेचे काही जण योगेश कदम यांना घेण्यासाठी थांबलेले आहे. तर काही दिवसांपूर्वी संजय राठोड याना पूजा चव्हाण प्रकरणातून क्लीन चिट माळाली होती .त्या वेळी भाजपने कोणतेही आक्षेप घेतले नाहीत साहजिकच ज्या संजय राठोड वर भाजप ने खुनी असल्याचा व चारित्र्यावर आरोप केले ते ही शिंदेच्या गोटात जाऊन भेटले आहेत . त्यांच्यासोबत संजय राठोड हे सुद्धा पोहोचले आहे.
त्यामुळे एकनाथ शिंदेंचा गटाची ताकद आणखी वाढली आहे. विशेष म्हणजे, अनिल परब यांच्याविरोधात भाजपचे नेते किरीट सोमय्यांना रसद पुरवण्याचा आरोप रामदास कदम यांच्यावर झाला होता. त्यानंतर रामदास कदम हे विधान परिषदेतून निवृत्त झाले होते. पण, सेनेनं त्यांना संधी दिली नाही.
योगेश कदम यांनाही पक्षाने डावललं होतं. अधूनमधून योगेश कदम हे शिवसेनेला घरचा अहेर देत होते. आता योगेश कदम हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले आहे. दरम्यान,’आम्ही 40 आमदार सोबत आहेत .
